महाराष्ट्र वेदभुमी

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत अंजली गणवीर प्रथम


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेतर्फे शिक्षकांमध्ये  निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी 'राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती' या खुल्या व अभिनव स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुमारी येथील उपक्रमशील शिक्षिका अंजली विकास गणवीर यांनी राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत इयत्ता ६ ते ८ गटात विज्ञान विषात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे... त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषण पुणे यांनी शिक्षकांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्ये निर्माण करण्यासाठी तसेच अध्यापनात आधुनिक तंत्रांचा वापर करण्याच्या उद्देशाने मागील वर्षी राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन केलेले होते... त्यात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत विविध विषयानुसार विविध गट तयार करण्यात आले होते...

Post a Comment

Previous Post Next Post