महाराष्ट्र वेदभुमी

सागर सम्राट न्हावे क्रिकेट संघाचा शुभारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर


सत्यप्रकाश आडाव ( चणेरा ): अस्सल लाल मातीतील क्रिकेट खेळ संध्या संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रातील ग्रामीण भागात  भलताच प्रसिद्ध आलेला खेळ पहायला मिळत आहे... या रायगड जिल्ह्यासह तालुक्यात टेनिस क्रिकेट गेल्या अनेक दशकापासून सागर सम्राट क्रिकेट न्हावे संघची दबंगगिरी पाहायला मिळालेली आहे....त्याच क्रिकेट संघातून अनेक खेळाडूने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे.... सध्या या चालू हंगामाचा शुभारंभ साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त दस-याच्या  निमित्ताने सागर सम्राट क्रिकेट न्हावे संघाने शनिवार दि.( १२ )  रोजी सागर सम्राट क्रिडा संकुलनच्या पटांगणात क्रिकेटचे शुभारंभ न्हावे सरपंच नितीन डबीर यांच्या हस्ते करण्यात आला... खेलाचे शस्त्र म्हणून स्टम्प , बॅट , बॉल त्यांची शस्त्र म्हणून देखील पुजा करण्यात आली... याप्रसंगी आजी , माजी खेळाडू , ग्रामस्थ व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.तसेच क्रिकेट संघाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या...

      न्हावे क्रिकेट संघाचा इतिहास आणि सागर सम्राट संघाची उत्पत्ती १९६५ पासून न्हावे गावात गावापातळीवर अगदी थोड्या प्रमाणात साध्या पद्धतीने क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. १९७५ नंतर न्हावे गावचं क्रिकेट एक करमणूकीच साधन म्हणून शाळेतील मुलं खेळायला लागली... १९८० ते १९८३ दरम्यान गावातील मुलांकडून गावपातळीवर स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला सुरुवात झाली... १९८३ नंतर  गावदेवी मरू आई मातेच्या नावाने, जयहनुमान आशा नावाने गाव पातळीवर तसेच तत्कालीन विभागीय क्रिकेट स्पर्धानमध्ये न्हावे संघ भाग घेऊ लागला. त्यानंतर १९८४ नंतर न्हावे क्रिकेट संघ एक दर्जेदार संघ म्हणून नामदेव इलेव्हन या नावाने विभागीय स्पर्धानमध्ये भाग घेऊ लागला, १९८६-८७ साली करंजवीरा-कोपरी येथील स्पर्धा खेळत असताना त्या स्पर्धेतील एका टीमचे सागर सम्राट हे नाव तत्कालीन संघ सहकाऱ्यांना विलक्षण आवडल्यामुळे व आपल्या संघाला ते नावं तंतोतंत जुळत असल्यामुळे संघातील प्रमुख खेळाडू व कर्णधार यांनी १९८६ मध्ये न्हावे क्रिकेट टीमला सागर सम्राट हे नाव दिलं...त्यानंतर ते आजपर्यंत विविध स्पर्धानमध्ये खेळतांना न्हावे संघ सागर सम्राट क्रिकेट संघ न्हावे या नावानेच विविध स्पर्धानमध्ये खेळत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post