महाराष्ट्र वेदभुमी

तोतया मालक बनुन फसवणूक करणारा दलाल विशाल विकास चालके इसमापासुन सावधान!


रोहा पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी...

शहानवाज मुकादम/रोहा 

रोहा: तालुक्यात तोतया मालक बनुन फसवणूक केल्या प्रकरणी विशाल विकास चालके व संबंधित टोळी यांच्या विरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे...विशाल चालके याच्याबाबत कोणाला ही माहीती असल्यास रोहा पोलीस ठाण्यात कळविण्यास विनंती आहे...

 विशाल चालके ही व्यक्ती मुंबई गोरेगाव येथे राहत असुन तो मोटर वाहन खरेदीत विक्रीच्या दलालीचा काम करतो...

 त्याने व त्याच्या संपर्कात असलेल्या अनेक इसमाच्या मदतीने रोहा तालुक्यात अनेक वाहन खरेदी विक्रीचे दलालीचे काम केलेचे समजते...

  असे असतानाच एका कारचा तोतया मालक बनुन  व्यवहरात फसवणूक केल्याची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल असुन विशाल चालके विरुद्ध गुन्हा दाखल करुन सदर टोळी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मांगणी मा. पोलीस निरीक्षक श्री देवीदास मुपडे यांचे कडे करण्यात आली आहे...

 पोलीस निरीक्षक रोहा यांनी सदर विषयाची दखल घेउन चौकशी सुरु केली असुन सदर विषयात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ही दिले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post