अनंता म्हसकर (धाटाव रोहा) : दीपावली तोंडावरच येऊन ठेपली आहे तरी एक विशेष बाब म्हणजे दिवाळीनिमित्त शासकीय कार्यालयात अनेक नागरिक व कंपन्यांमधील अधिकारी तसेच कंपनीतील ठेकेदार असे सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना काजू, बदाम भेट देतात...
यामुळे शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार वाढत असून नागरिक आपले काम करून घेण्यासाठी अप्रत्यक्षरित्या भेट स्वरूपात भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात...असेच याच्यातून दिसून येत आहे काम कोणतेही असो सरकारी कर्मचाऱ्याने त्याचे काम चोख पार पाडावे..
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन चांगले असून तरीही ते नागरिकांकडून व कंपनीमधील ठेकेदार तसेच कंपनी अधिकारी यांच्याकडून काजू-बदामाची अपेक्षा करतात...
अशा या भेटवस्तू बॉक्समध्ये नक्की काजू, बदाम आहेत की नोटा आहेत याचा निष्कर्ष काढणे अवघड होते...
प्रशासनाने वेळोवेळी लोकसेवकाने कार्यालयात अशा भेटवस्तू स्वीकारणे हे गैरवर्तन असून त्याच्या कृतीस घातक आहे असे स्पष्ट केले आहे...
लोकसेवकाने शासकीय कार्यालयात भेटवस्तू घेणे हे त्याचे कृत्य गैरवर्तन करणारे आहे...
कारण येथे काही कंपन्यांमध्ये अनेक वर्ष कॉन्टॅक्ट मध्ये काम करणाऱ्या कामगारास ८ आठ तासाची शिफ्ट असून त्यास बारा तासाची शिफ्ट करण्यास भाग पाडून त्यास पुढील चार तासाचा तर कधी १६ तासाचा ओटी ही डबल न देता काम करूनही मोबदला तुटपुंजाज अनेकांना पीएफ मिळतो ना बोनस... आरोग्याची हमी तर दूरच कंत्राट दाराने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी तर जमा केलाच पाहिजे परंतु पुरेसा बोनस ही देताना याच कंपन्यांच्या नाके नऊ होत आहे असे दाखवून देत असलेल्या या कंपन्या सरकारी कर्मचाऱ्यास हे काजू बदामाचे बॉक्स कशासाठी देतात तेच पैसे आपल्या कर्मचाऱ्यांवर का खर्च करत नाही...
तसेच नागरिकांची सर्व कामे संविधान मार्गाने शासकीय कार्यालयात झाली पाहिजे...
परंतु अनेक शासकीय कर्मचारी जाणून-बुजून नागरिकांकडून तसेच कंपनी ठेकेदार व कंपनी अधिकारी यांच्याकडूनही अप्रत्यक्षरीत्या पैशाची मागणी करतात... काजू, बदामाची अपेक्षा करतात...दिवाळीनिमित्त आमच्यासाठी काय आहे अशी विचारणा नागरिकांना करतात...
यामुळे शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार वाढत असून नागरिक आपले कामे करून घेण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना काजू बदाम भेट देत असतात...
असे काजू बदाम देणे हे चुकीचे असून भ्रष्टाचाराला हे पोषक वातावरण निर्माण करणारे कृत्य आहे...महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य शासनाच्या कार्यालयात काजू बदाम देणाऱ्या आणि घेणाऱ्या नागरिकांची तसेच लोकसेवक याची सखोल चौकशी करण्यात यावी,असे कार्यालयात आलेले काजू, बदाम जप्त करून त्याची कार्यालयात नोंद ठेवण्यात यावी... व तसेच भेटवस्तू स्वीकारणे बंद केल्याने शासकीय कार्यालयात पारदर्शकता निर्माण होईल..व काजू बदाम द्यायला आलेल्या नागरिक तसेच कंपनी मधील अधिकारी यांच्यावर ही कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी...