महाराष्ट्र वेदभुमी

वांद्रा रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी अनेक जखमी

२९/१०/२०२४

मुलुंड प्रतीनीधी: श्री.सतिश वि.पाटील: मुंबईतील वांद्रे टर्मिनल रेल्वे स्थानकावर ट्रेन मध्ये चढण्यासाठी अचानक प्रवाशाची गर्दी वाढली आणि गोंधळ उडाला वांद्रे - गोरखपूर ट्रेनमध्ये चढत असताना ही घटना घडली त्याचे रूपांतर नंतर चेंगराचेंगरीत झाले...वांद्रे रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बाबा हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले .चेंगराचेंगरीत ९ जण जखमी अवस्थेत असून २जणांची प्रकृती चिंताजनक आहे...

या दुर्घटनेत जखमींची संख्या आणखी वाढू शकते...वांद्रे टर्मिनल मध्ये नेमकं काय घडल?रविवारी रात्री मध्ये रात्री वांद्रे रेल्वे स्थानकातून पॅसेंजर ट्रेन २:४५ च्या सुमारास ट्रेन क्रमांक २२९२१ अंत्योदय एक्स्प्रेस (वांद्रा-गोरखपूर एक्स्प्रेस )यार्ड वरून  प्लॅटफॉर्म नं. १ वर हळूहळू येत होती ही ट्रेन पहाटे ५:०० वाजता सुटणार होती दोन तास आधीच ट्रेन लागली होती परंतु ही ट्रेन स्थानकात थांबत नाही तोवर प्रवाशांची झुंबड उडाली आणि चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला... त्याच दरम्यान दोन प्रवासी खाली पडले आणि जखमी झाले त्यातच आणखी काही प्रवासी पडले असतं त्यात सात प्रवासी जखमी झाले.. त्यानंतर सर्वच स्थानकात गोंधळ निर्माण झाला.. या ट्रेन सर्व डबे अनारक्षित असल्याने आपल्याला जागा मिळावी म्हणून लोकांनी गोंधळ घातला दिवाळी व छट पुजे निमित्त गावी जाणाऱ्या ची गर्दी होती...युपी बिहारचे प्रवाशी जास्त होते त्यात जनरल गाडी घोषित केल्याने सीट मिळवण्यासाठी चेंगराचेंगरी झाली...घटनेतील २ जण गंभीर  व ७ जणांची प्रकृती स्थिर असून बाबा हाॅस्पिटल भरती आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post