सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- विद्यासागर कला महाविद्यालय व ग्राम पंचायत खैरी (बिजेवडा) यांच्या सहकार्याने तथा स्वीप अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदार जनजागृती रैलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी रैलीला प्राचार्य डॉ. सुरेश सोमकुवर यांनी महाविद्यालयातून झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली. रॅली पाचगाव, वाहिटोला.मार्गाने मार्गक्रमन करीत ग्राम पंचायत येथे समापन करण्यात आले. मतदार जागृती रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी फलक घेऊन व घोषणा देत मतदारांना १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.
रॅलीचे समापन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश सोमकूवर यांनी विद्यार्थ्यांना आप आपल्या गावी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करावे व आपला हक्क बजावावा हे सांगितले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल दाणी यांनी केले.तसेच सर्व विद्यार्थांना डॉ. ज्योती कवठे यांनी शपथ दिली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गिरीश सपाटे,डॉ. रवींद्र पानतावणे,डॉ. विलास जायभाये, प्रा. गंगा मोंढे,श्री जितेंद्र बडनाग तथा ग्राम पंचायतचे कर्मचारी व पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.