महाराष्ट्र वेदभुमी

रोहा पोलिसांची गांजा विकणाऱ्यावर कारवाई ,


५५०.५० ग्राम गांजा जप्त 

प्रतिनिधी :- सत्यप्रसाद आडाव चणेरा : या बाबत रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , बुधवार दि. (२३ )  रोजी रोहा शहरातील खालचा मोहल्ला मुस्लिम कब्रस्तान जवळ जामा मशीद रोडवर अरबाज अहमद बडे वय वर्षे  (२४)  रा. खालचा मोहल्ला  हा आरोपी  गांजा विकत असल्याची माहिती रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे  यांना मिळाली असता  सहायक पोलीस निरीक्षक ए. आर . रावडे, पोलिस हवालदार म्हात्रे, अनिल पाटील यांनी सापला रचून गांजा विकणाऱ्या  अरबाज अहमद बडे  या आरोपीच्या रोहा पोलिसांनी मुसक्या आवळल्या... 

      आरोपींने ५५०. ५० ग्रॅम वजनाचा गांजा  या मादक व नशा कारक पदार्थ काळ्या  रंगाच्या पिशवीत  ठेवला होता .या गांजा ची किंमत ८५०० रुपये इतकी आहे. तर आरोपीवर काँ. गु. र. न.   २००/२०२४  , गुंगीकारक औषध  द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५  कलम  ८ (क ) , २०(ब ) , २ (अ)  असे कलम आरोपीवर पोलिसांनी दाखल केलेले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post