सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील स्मशानभूमीच्या सुशोभिकरण कामाचे लोकार्पण सोहळा शुक्रवार दि.११ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव प्रविण दादा ठाकूर व रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाल
मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व माजी मापगाव ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी यांनी मापगाव ग्रामपंचायतीकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे व सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी अगदी मनापासून मुनवली स्मशानभूमीचे सुशोभिकरण सुंदर व आकर्षक असे काम युद्धपातळीवर पूर्ण करून केल्याबद्दल प्रविणदादा ठाकूर व सुनिल थळे यांनी विशेष कौतुक केले. तसेच मुनवली येथील महेश नागावकर यांनी आपल्या वैकुंठवासी आईवडिलांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीच्या कमानीवरील नामफलक दिले. यासोबतच घाडी बंधुनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत पाण्याचा पंप टाकून त्याठिकाणी स्टॅन्डवर टाकी बसवून वापरासाठी नळ कनेक्शन करून दिले, याबद्दल त्या सर्वांचेही कौतुक करत आभार मानले...
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव प्रविणदादा ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, मापगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच उनीता थळे, यांच्यासह गुरुवर्य चांदोरकर सर, मापगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच समद कुर, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोत, संजय शिंदे, सोगाव मुस्लिमिन अध्यक्ष मुर्तुजा कुर, आत्माराम पंडम, बाळाराम थळे, गोविंद अनमाने, मधुकर सूद, दिलीप मोंढे, विवेक जोशी, सुरेश राऊत, सामाजिक कार्यकर्ते सतिश घाडी, सचिन घाडी, रुस्तुम कुर, राजेंद्र घरत, सूचित थळे, संतोष बांद्रे, मनिष खाडे, शैलेश तिर्लोटकर सर, संजय अनमाने, अशोक मोंढे, रुपेश नागावकर, संदेश पाटील, राकेश पवार, गितेश ठकरुळ, नितेश ठकरुळ, सुयोग अनमाने, रोशन अनमाने, अनिल अनमाने, प्रविण घाडी, साहिल कुर, शबाब खान, विलास पाटील, अक्षय नागावकर, शिराज खान, जलील पठाण यांच्यासह मूनवली, सोगाव व पंचक्रोशीतील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...लोकार्पण सोहळ्यावेळी नुकतेच प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले असल्याने त्यांना उपस्थित सर्वानी श्रद्धांजली वाहिली...
फोटो लाईन : मुनवली येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरण लोकार्पण सोहळा निमित्ताने उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ,
.jpg)