महाराष्ट्र वेदभुमी

नवयुवक ग्रामस्थ मंडळ चोंढी मंडळाला दिली ५० हजारांची देणगी

किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व इतर ग्रामपंचायत सदस्य,सदस्यांकडून देणगी

सोगाव - अब्दुल सोगावकर : आपल्या दानशूर वृत्तीमुळे अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे चोंढी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम ग्रामपंचायत सरपंच पिंट्या गायकवाड तसेच किहीम ग्रामपंचायत सदस्य गणेश भोईर व सदस्या जागृती जरंडे, कल्पिता आमले यांच्यातर्फे चोंढी येथील नवयुवक ग्रामस्थ मंडळ चोंढी मंडळाला नवरात्रोत्सवातील काळात भवानी देवी मूर्तीच्या दागिन्यांसाठी बुधवार दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी नवरात्रोत्सव निमित्ताने मंडळाच्या रेकॉर्ड ब्रेकडान्स कार्यक्रमाचे औचित्य साधून तब्बल ५० हजार रुपयांची देणगी मंडळाच्या सभासदांना सुपूर्द केली... याबद्दल मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले...

          यावेळी नवयुवक ग्रामस्थ मंडळ चोंढीचे सर्व आजी- माजी पदाधिकारी व किहीम ग्रामपंचायत सदस्य, सदस्या व चोंढी येथील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते... भरघोस देणगी दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने सरपंच पिंट्या गायकवाड यांचा व इतर ग्रामपंचायत सदस्य आणि सदस्या यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला...

फोटो लाईन : नवयुवक ग्रामस्थ मंडळ चोंढी मंडळाला देणगी देतांना किहीम सरपंच, सदस्य, सदस्या व उपस्थित नवयुवक ग्रामस्थ मंडळ चोंढीचे पदाधिकारी,

Post a Comment

Previous Post Next Post