महाराष्ट्र वेदभुमी

लायन्स क्लब कोलाडच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप.


पुगाव - खांब (नंदकुमार कळमकर) कोलाड लायन्स क्लबच्या वतीने रोहा तालुक्यातील मौजे पुई येथील गरजु विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले आहे.लायन्स क्लब इंटरॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 ए 4 च्या अधिपत्याखाली गेली चार वर्षे कोलाड विभागात कोलाड लायन्स क्लब विविध उपक्रम राबवत आहे या अनुषंगाने विभागातील पुई येथील कु.मंजीरी संतोष दिवेकर इयत्ता सहावीत कोलाड हायस्कूल येथे शिक्षण घेत असलेल्या या गरजवंत विद्यार्थिनीला सायकलचे वाटप करण्यात आले...

कोलाड लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष तथा मार्गदर्शक डॉ सागर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली व लायन्स क्लब सह खजिनदार अलंकार खांडेकर यांच्या विशेष सहकार्यातून लायन्स क्लब कोलाड च्या वतीने सायकल वाटप करण्यात आली यावेळी क्लबचे अध्यक्ष डॉ मंगेश सानप, सेक्रेटरी रविंद्र लोखंडे, उपाध्यक्ष डॉ श्याम लोखंडे,लायन डॉ.प्रो.माधव आग्री, नंदकुमार कळमकर, अनिल महाडिक, दिनकर सानप, आदी लायन मेंबर्स तसेच अनंत सानप, विठ्ठल पवार, समीर पडवळ, हरिश्चंद्र कदम, अजीत लहाने,सचीन दिसले, गोपाळ खामकर, सुनिल लहाने, आत्माराम खामकर, राजेंद्र कदम, पांडुरंग खामकर, मंगेश सानप, वीश्वास लहाने, संदेश मोहीते, संदिप शिर्के, वामन कदम, वीठोबा सानप, सचीन लहाने, लक्ष्मण पवार, अनिकेत शिर्के, श्रीकांत लहाने, आलोक दिवेकर, प्रकाश पाटील, हेमंत महाडीक,.सह पुई ग्रामस्थ उपस्थित होते...

तर लायन्स क्लब कोलाड कडून एक अनोखा उपक्रम राबविला गेला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post