सोगाव -अब्दुल सोगावकर : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील मांडवा सागरी पोलिसांचा उपविभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग विनीत चौधरी सो. यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि.१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते ७ वाजेपर्यंत मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोंढी व झिराड येथे रूटमार्च करण्यात आले...
सदर रूटमार्च चोंढी येथे स.म.वडके शाळा, चोंढी नाका, अपना बाजार, चोंढी रेल्वे फाटक, मुख्य बाजारपेठ, चोंढी पूल याठिकाणी काढण्यात आले. तसेच झिराड येथे स्टेट बँक ऑफ इंडिया, वैभव हॉटेल, मुख्य बाजारपेठ, पाटील पोल्ट्री, मांडवा सागरी पोलीस ठाणे असा पद पथ संचलन (रुटमार्च)करण्यात आले...
यावेळी रूटमार्च मध्ये मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भोई, दुय्यम अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. खोत, पोलीस उपनिरीक्षक श्री. वाणी असे ३ अधिकारी, १० अंमलदार, आरसीपी(RCP) प्लाटून वडखळचे ३२ अंमलदार, सीआयएसएफचे(CISF)४६ जवान या रूटमार्च मध्ये सहभागी झाले होते. पहिल्यांदाच असा काढलेला रुटमार्च पाहून परिसरातील ग्रामस्थ सुरवातीला गोंधळलेल्या स्थितीत होते, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने सदर रुटमार्च काढण्यात आल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला...
फोटो लाईन :मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोंढी येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेला रूटमार्च


