महाराष्ट्र वेदभुमी

श्रीवर्धन मतदार संघात अदिती ताई?...की अनिकेत भाई?....

 


पदाधिकारी कार्यकर्ते संभ्रमात.. कोणता झेंडा घेऊ हाती?..                        

 रोहा ( वार्ताहार ) :  महाराष्ट्रातल्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये निवडणुकीचे वातावरण तापल्याचे दिसून आले... त्याचाच एक भाग समोर आला आहे... अनिकेत भाईंच्या स्पर्धकांनी सोशल मीडियावर आप की बार ... अनिकेत भाई आमदार... असा उल्लेख असणाऱ्या पोस्ट वायरल झाल्या...तर दुसरा भाग म्हणजे अदिती ताईच्या.. समर्थकांनी .. कहो दिलसे ... श्रीवर्धन मतदार संघ में...अदिती ताई तटकरे फिरसे.. अशा पोस्ट वायरल झाल्या आहेत.... त्यामुळे श्रीवर्धन मतदार संघामध्ये कमालीची उत्सुकता लागली आहे...     

 श्रीवर्धन मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला  आहे.... मात्र आता श्रीवर्धन मतदार संघात  ताई....?  की भाई...? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आता पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडल्याचे दिसून आले आहे...

 कोणता झेंडा घेऊ हाती?- असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे... तर दुसरीकडे महाविकास आघाडीची जय्यत तयारी झाली असून लवकरच  शरद पवार गटाचे प्रदेशाअध्यक्ष श्री जयंत पाटील उमेदवार घोषित करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येतेय...

Post a Comment

Previous Post Next Post