उपविभागिय अधिकारी तर्फे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना निवेदन
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध मांगण्या हिताच्या गोष्टी करत शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी माजी आमदार डी. मलिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात दिनांक १ ऑक्टोबर मंगळवारी महायुती आघाडीच्या वतीने येथील शांती मंगल कार्यालय बस सॅन्ड पासून तहसील कार्यालयावर हजारो कार्यकर्तेसह धडक मोर्चा काढत भ्रष्टाचारमुळे त्रस्त जनतेच्या समस्याचे निराकारण व समस्या विषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , उपविभागीय अधिकारी रामटेक यांचा मार्फत निवेदन देण्यात आले...
पांधन रस्त्याने त्रस्त शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, रखडलेला तीर्थक्षेत्र विकास, कोरडवाहू क्षेत्र सिंचन, वनशेत्र आदिवासी ४२ गावांना वाघामुळे बळी पडणारी जनता, घरकुल पासून वंचित असणारे बेघर लोक, मागील ७ वर्षांपासून महाराष्ट्र खनिक्रम विकास महामंडळ युवकांना कसलाही रोजगार उपलबध केलेला नाही, कृषि उत्पन्न बाजार समिती चा उपबाजार सुरु करण्यात यावा, सोयाबीन व कापूस ला आधारभूत किंमत जाहीर करावी, इत्यादी मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्या नंतर शांती मंगल कार्यलय येथे सभा घेण्यात आली... रेड्डी यांनी आपल्या भाषणात बोलतांना म्हणाले की २० वर्ष असलेल्या आमदारांनी कोणताही विकास केला नाही. १५० कोटीचे विकासचे कामे आले असून तेही पूर्ण केले नाही... सभेला जिल्हा भाजपा उपाध्यक्ष राजेश ठाकरे, नमो नमो मोर्चा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार , उपसभापती नरेंद्र बंधाटे, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य व्यंकट कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम, मा. न. पा. उपाध्यक्ष आलोक मानकर, मा. न. पा. सभापती संजय बिसमोगरे शहर अध्यक्ष उमेश पटले, रवी चव्हाण, रेखा दूनेदार, सागर गावंडे, सागर लोंढे, सुखदेव शेंद्रे, मा. न. पा. सदस्य चित्रा धुरई, नेहा गावंडे, संजय अजबिले, योगेश मात्रेनंदलाल बावनकुळे, फजित सहारे, कुणाल कांबळे, गणेश बगमारे, हेमंत जैन, केशव मेहर, वसंता कोकाटे व मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते...
