संघटनेच्या दोनही मागण्यांची पुर्तता , पुढील ४ दिवसात होणार कार्यान्वयन
१) तालुक्यात शेतीला पुर्णवेळ विद्युत पुरवठा
२) पुर्ण वेळ निवासी वायरमन ची व्यवस्था होणार
वर्धा प्रतिनिधी: मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी म. रा. विद्युत वितरण कार्यालय सेलू येथे किसान अधिकार अभियानच्या माध्यमातून तालूक्यातील ओलिताखालील शेतीला विद्युत पुरवठ्याच्या संबंधाने येणार्या अडचणीसाठी जाहिर शेतकरी ठिय्या आंदोलन करण्यात आले...यावेळी सहाय्यक अभियंता माननीय शिरपुरकर साहेब यांचे सोबत बराच वेळ चर्चा झाल्या...निर्णय होईपर्यत ठिय्या आंदोलन कायम करण्याचा निर्धार सांगितला..
सहाय्यक अभियंता माननीय शिरपुकर साहेब यांनी दुरध्वनीवरून आंदोलनाची माहीती वरिष्ठांना दिली... त्यानंतर काहीच वेळात वरिल दोनही मागण्या मान्य केल्या व किसान अधिकार अभियानला तसे लेखी पत्र लिहून दिले...
किसान अधिकार अभियानाच्या ठिय्या आंदोलनामुळे सेलू तालूक्यातील शेतकर्यांचा ओलितासाठी विद्युत पुरवठ्याचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला...
