महाराष्ट्र वेदभुमी

वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रम शाखा क्र.११ पेण-तळे येथे संपन्न.


माणगाव :- (नरेश पाटील) तालुक्यातील बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र.११ नालंदा बौध्दजन सेवा संघ, पंचशील महीला मंडळ आणि भिमगर्जना मित्र मंडळ पेण/ तळे यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रम रवीवारी दि.२९ सप्टेंबर रोजी बौ.पं.स. शाखा क्र.११ चे अध्यक्ष संतोष बाबाजी कासारे यांच्या अध्यक्षतेखाली नालंदा बुद्धविहार मु.पो. पेण/तळे, ता. माणगाव - रायगड जिल्हा येथे आयोजित करण्यात आला होता... यावेळी धम्म ध्वजारोहन,पूजापाठ, प्रमुख मान्यवर तसेच पाहुणे यांचे स्वागत समारंभ आणि वर्षावासाचे प्रवचन "उपोसथ पालन" या विषय पर प्रवचन कार्यक्रम पार पडले आणि दुपारी स्नेह भोजनाने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली...


दरम्यानचा काळात प्रवचन कार्यक्रमास बौध्दजन पं.स.माणगाव तालुका कार्यकारणी चे अध्यक्ष रविंद्रजी मोरे, पदाधिकारी आर.डी. साळवी, रणजित मोहिते, प्रसिध्दी प्रमुख पत्रकार  उत्तम तांबे यांचे खास उपस्थिती होती.. तर माजी रायगड जिल्हा परीषद (राजीप) समाज कल्याण विभागाचे सभापती अशोक गायकवाड, संजय गायकवाड, ॲड. राकेश मोरे, दीपक मोरे, पत्रकार विशवास गायकवाड (प्रसिध्दी प्रमुख), पत्रकार नरेश पाटील, जनार्दन गायकवाड, सखाराम गायकवाड, अविष्कार गायकवाड, रमेश घोगरे, विक्रम वाठोरे, जितेंद्र साळवी, बंडू मोरे, प्रकाश ओव्हाळ, भाऊ ओव्हाळ, गौतम मनवर, योगेश शिर्के, प्रवीण बागवे, महादेव पवार, बौद्दचाऱ्या गांगवणे, निलेश साळवी, प्रशांत मोरे, गंगाधर जाधव तसेच इतर साखा येतील अध्यक्ष,अनेक पदाधिकारी, सदस्य, धम्म उपाशक तसेच समाज बांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होते...


दरम्यानचा काळात पूजापाठ श्रमनेर आयु. गोविन्द तांबे यानी केले आणि प्रवचन अरविंद मोरे गुरुजी यांनी केले... सदर कार्यक्रम करीता संदीप कासारे व संतोष कासारे यानी सूत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन संदीप कासारे यानी केले... दरम्यान प्रवचनकार अरविंद मोरे गुरुजी यांनी अत्यंत अभ्यासूपर धम्म प्रबोधन सुमारे सव्वा तास केले तर ' उपोसथ पालन हा विषय सादर करण्याचे विषय बौ. पं. स. ता. अध्यक्ष रविंद्रजी मोरे यांनी सुचविले होते तर अनेक शाखा येथेही विविध धम्म प्रबोधन विषयपर वर्षावास कार्यक्रम आखण्यात आला होता आणि शाखा क्र.११ पेण/तळे येते सदर दिनी शेवट करण्यात आली तसेच येत्या महिना दि. १७ रोजी माणगाव शहरात आयोजित केल्याचेही भाषण दरम्यान सांगीतले आणि कार्यक्रम अत्यंत यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेल्या शाखा क्र. ११ चे सर्व पदाधिकारी यांचे माननिय रविंद्र मोरे यांनी पुष्प गुच्छ देवून खास अभिनंदन व कौतुक केले...

Post a Comment

Previous Post Next Post