महाराष्ट्र वेदभुमी

स्वर-संवाद जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धा, वर्धा क्रीएटर अवॉर्ड वर्धा २०२४


डॉ सचिन पावडे यांचे नेतृत्व

वर्धा प्रतिनिधी: वर्धा ,वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा, डॉ. सचिन पावडे मित्र परिवार आणि प्रगती संगीत विद्यालय वर्धा आयोजित स्वर-संवाद जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेची पहिली फेरी दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहात पार पडली... या ऑडिशन राऊंडमध्ये वर्धा जिल्ह्यातील ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला, ज्यात प्रत्येकाने आपल्या आवाजाची जादू दाखवली... स. ९:०० ते संध्या. ४:०० या वेळेत झालेल्या या फेरीतून अंतिम फेरीसाठी १० स्पर्धकांची निवड करण्यात आली...

स्पर्धेची अंतिम फेरी दि. २९ सप्टें २०२४ रोजी स. १०:०० ते दु. २:०० वाजेपर्यंत पार पडली... स्पर्धकांनी एकाहून एक सुरेख गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले... अंतिम फेरीतून विजेते ठरविण्यात आले... यावेळी वर्धा creators अवॉर्ड देखील देण्यात आला, ज्यामध्ये वर्धेतील सोशल मीडियावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकांचा सन्मान करण्यात आला...

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक उपस्थित होत्या... त्यांच्या हस्ते गायन स्पर्धेचे विजेते घोषित करून त्यांना गौरविण्यात आले... प्रथम विजेता सुरेंद्र डोंगरे, द्वितीय विजेता संतोष तायडे, तर तृतीय विजेता सतीश वानखेडे ठरले...

याशिवाय प्रोत्साहनपर सात पारितोषिक ऋषभ लोणबळे, प्रदीप रुईकर, साहिल पांढरे, मयूर पटाईत, जानवी वंजारी, आर्ष चावरे, गिरीश सावळकर या स्पर्धकांना देण्यात आले... विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार सार्थक गंजीवाले आणि प्रशांत गाढेकार यांना देऊन गौरविण्यात आले...

कार्यक्रमादरम्यान, वर्धेतील राहुल शिंदे, राहुल कोसुरकर, सोहेल शेख, हुणेन अली, अक्षय मांडेवार, साक्षी शिरसाट, पायल ठाकरे, जानवी साबळे, प्रसाद मोकदम आणि इतर creators यांचा देखील सन्मान करण्यात आला...

स्पर्धेचे परीक्षण खुशबू कठाने, नितीन वाघ यांनी केले, तर रील्स स्पर्धेचे परीक्षण हरिष इथापे, ट्विंकल बोरकर, सोहेल शेख, राहुल कोसुरकर, हुणेन अली यांनी केले... या कार्यक्रमाचे संचालन संध्या सायंकाळ यांनी केले...

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले... त्यांच्या मित्र परिवार आणि टीमने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले...

Post a Comment

Previous Post Next Post