सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ प्रत्येक वर्षी राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या निमित्ताने २४ सप्टेंबरला दिला जातो...
यावर्षीचा पुरस्कार ताई गोळवलकर महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक अमेय देवेंद्र अवथरे याला सम्मानीत करण्यात आले... अमेय ने २०२२-२३ मध्ये मनाली येथे आयोजित राष्ट्रीय सहासी शिबिर, नागपूर येथे आयोजित जिल्हा आपदा प्रबंधन शिबिर मध्ये भाग घेतला आणि उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले...
सत्र २०२३ - २४ मध्ये गणतंत्र दिवस पूर्व संचलन राज्यस्तरीय निवड शिबिर, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे भाग घेतला... तसेच २६ जानेवारी २०२४ ला शिवाजी पार्क मुंबई येथे राष्ट्रीय गणतंत्र दिवस पथ संचलन मध्ये भाग घेतला... सोबतच अमेय यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांमध्ये भाग घेतला... यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर चंद्रमोहन सिंग बिष्ट यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस करिता शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या....
