माँ कालंका मंदिर - शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- रामटेक येथील कालंका देवी म्हणजे कालीदेवीचे स्वरूप, महाकालीचे प्रतिक आहे... तिलाच आदिशक्तीचेही एक प्रतीक मानले जाते...भक्तांचा विश्वास आहे की, भक्तांची श्रद्धा उत्कट झाल्यास दृष्यरूपाने व्यक्त होवून देवी साक्षात दर्शन देते...रामटेक येथील मॉं कालंका देवी मंदिरात नवरात्रोत्सवा दरम्यान देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते.दूर-दूरून भक्त दर्शनासाठी येतात... यावर्षी दि.०२ ऑक्टोबरला घटस्थापना होवून नवरात्र उत्सव प्रारंभ होणार आहे...या शारदीय नवरात्रौत्सवासाठी भक्तांमधे विशेष उत्साह आहे... या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू केली व अंतीम टप्प्यात आहे...
कालंका (कालका) देवी मंदिर हे पुरातन आहे .राष्ट्रकूट कालीन इ.स. ८ ते ९ व्या शतकातले असल्याचे सांगितले जाते. मंदिरात कालंका देवीची सुरेख अशी संगमरवरी ४ फुटाची मुर्ती आहे...प्राचीन स्थापत्य कलेच्या दृष्टीकोनातून विचार करता हे मंदिर रामटेकचे गडमंदिर परिसरातील वाकाटक कालीन नरसिंह मंदिरानंतरच्या मंदिर स्थापत्य रचनेत झालेल्या प्रगतीचा टप्पा दाखवणारे मंदिर आहे...रामटेक शहराच्या उत्तर टोकाला पूर्वमुखी असलेल्या या मंदिरात गर्भगृह व मंडप असे दोन प्रमुख भाग आहेत...मंदिराचे संपूर्ण बांधकाम वालूका पाषाणातील आहे... मंदिराचे शिखर अर्धवर्तुळावर पद्म नक्षींनी अलंकृत असुन गजपृष्ठाकृती म्हणजेच हत्तीच्या पाठीच्या आकाराचे आहे...कालंका देवीचे हे मंदिर प्राचीन स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो...
कालंका देवी मंदिर कमेटीचे अध्यक्ष मधुकर सहारे, सुधाकर सहारे, सचिव प्रशांत सिरसकर, कोषाध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, दिलीप देशमुख, अनिल भोरसले, अरविंद अंबागडे, रमेश कोठारी, दयाराम रेवतकर, बबन क्षीरसागर, नत्थू घरजाळे, दुर्गेश खेडगरकर, रीतेश चौकसे, सुमित कोठारी, निर्भय घाटोळे, महेंद्र माकडे,रवी महाजन, वसंत डामरे आदि पदाधिकारी नवरात्र उत्सवाच्या व्यवस्थेची तयारी करीत आहेत...
