पहिल्याच दिवशी वाघांची डरकाळी पेंच व्याघ्रमध्ये पर्यटकांनी लुटला पहिल्याच दिवशी आनंद
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:-महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर जंगल सफारीचा आनंद तुम्ही अभयारण्यात घेऊ शकता... चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह, नागपूर जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे पर्यटन १ ऑक्टोबर पासून पर्यटनासाठी खुलं झाले आहे...
देशभरात पावसाने विश्रांती घेतली असून वातवरण आल्हाददायक आहे... अशा स्थितीत तुम्ही विकेंडला किंवा दिवाळी आणि नाताळच्या सुट्टीला कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे... कारण सुट्टीच्या काळात तुम्ही जंगल सफारीचा मनमुराद आनंद घेऊ शकता...
देशातील सर्वञ नावाजलेला व्याघ्र प्रकल्प अशी ओळख असलेल्या आणि जैवविविधतने नटलेल्या रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघासह विविध वन्यजीवांचे दर्शन पर्यटकांना होते... वाघाची डरकाळी अन् मोराचा केकारव असा जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना अनुभव येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्पाची द्वारे मंगळवार पासून पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी खुला झाला... अन् पहिल्याच दिवशी टी ६२ वाघीण ३ बछड्यांसह दिसल्याने पर्यटक फार आनंदी झाला... सदर वाघीण फेफाडीकुंड रस्त्यावर दिसून आली... आणी तिला कॅमेरॅत कैद केले सुशांत शाह व सौरभ सिंग या पर्यटकांनी. वाघांसह वन्यजीवांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी विदर्भासह विदर्भाबाहेरील पर्यटक येतात... इतकेच नव्हे तर या ठिकाणी आतापर्यंत अनेक व्हीव्हीआयपींनीही हजेरी लावून जंगल सफारीचा आनंद लुटते आहे... पावसाळ्याच्या दिवसांत हा व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी बंद असतो... तर आता मंगळवारपासून पुन्हा हा व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी खुला करण्यात आला... १९७५ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात टि-६२, टि-२४, टि-१०१, नामक वाघिण तसेच टि-८५ ,टि-९३ नामक रुबाबदार वाघ आहे... त्यांची एक झलक बघण्याची इच्छा येथे जंगल सफारीसाठी येणाऱ्यांना असते. रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी खुला होणे ही बाब वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमीच आहे...
ऑनलाइन पद्धतीने करता येणार बुकिंग
'मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १ ते १५ ऑक्टोबरपर्यंत जर तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर तुम्हाला ऑफलाइन बुकिंग करावे लागेल... गेटवरील वाहन क्षमतेच्या मर्यादित सफारी सुविधा उपलब्ध राहणार आहे...तर दिनांक १६ ऑक्टोबर पासून महाइको टुरिझमच्या संकेतस्थळावरून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे...
विवेक राजूरकर वनपरीक्षेत्र अधिकारी पेंच व्याघ प्रकल्प, सिल्लारी
बफर क्षेत्रात राहते टायरगरची मुव्हमेंट
१९७५ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन ४३९.८४ कि.मी, तर बफर झोन २०५.०३ कि.मी. इतका आहे... या व्याघ्र प्रकल्पात सुमारे ५५अधिक प्रौढ वाघांचे वास्तव्य आहे...
७० जीप्सी जंगल सफारीसाठी
५० पेक्षा अधिक प्रौढ वाघांचे वास्तव्य
४३९.८४कि.मी कोअर क्षेञ
२०५.०३ कि.मी बफर क्षेञ
या व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र वाघ, बिबट,अस्वल आदी वन्य जीवांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरत असून; पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातही वाघांची मुव्हमेंट असते...
