स्वप्निलभाऊ घोलप युवा मंच च्या वतीने"सन्मान कर्तुत्वाचा” कार्यक्रमाचे आयोजन
नवीमुंबई नेरुळ प्रतिनिधी : दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व स्वराज्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल घोलप यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने नवी मुंबई जुईनगर येथील गावदेवी समाजमंदिर हॉलमध्ये स्वप्निलभाऊ घोलप युवा मंच च्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...
हया कार्यक्रमात मुख्य आकर्षण म्हणजे युवा व्याख्यानकार, कीर्तनकार सोपानदादा कनेरकर यांचे महिला सबलीकरण, तरुणपीढ़ी साठी मार्गदर्शन, परंपरा- संस्कृतिचे पैलू आपल्या जीवनात कसे रुज़ले पाहिजेत याबाबत व्याख्यान आयोजित केले होते...त्या कार्यक्रमात सोपान महाराजानी आजच्या तरुण पीढ़ीने कशा पद्धतीने समाजात वावरले पाहिजे...यावर त्यानी मार्गदर्शन केले... शेकड़ो नवी मुंबईकरानी कार्यक्रमाला हज़ेरी लावून व्याख्यानाचा आनंद घेतला...
त्याचसोबत स्वप्नील घोलप यांनी “सन्मान कर्तुत्वाचा” या सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन केले होते... त्यांनी समाजातील महाराष्ट्राची परंपरा व वारसा जपणाऱ्या संस्था सामाजिक संस्था, वासुदेव, मरीआईचा देवारावाले, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, दहीहंडी उत्सव मंडळ, महिला बचत गट, पत्रकार, ढोल ताशा पथक , लेझीम पथक, अशा क्षेत्रातील सर्व व्यक्तिना व संस्थाना त्यांच्या कर्तुत्वामुळे याठिकाणी सन्मानित करण्यात आले...
शेवटी आपल्या मनोगतात स्वप्निल घोलप यांनी सांगीतले की, आपण सर्वानी महाराष्ट्राची परंपरा - संस्कृतिचा वारसा हा जपला पाहिजे.. म्हणून समाजातील सर्व परंपरा जपणाऱ्या घटकांचे आपण देणे लागत आहोत... त्यासाठी हा सन्मान कर्तुत्वाचा कार्यक्रम हया वाढदिवसाच्या दिनी संपन्न करण्यात आला...
.jpg)
.jpg)
.jpg)