पनवेल विशेष प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ पनवेल व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १३ अक्तोब्रला जनता विद्यालय मोहोपाडा ,रसायनी, पनवेल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले....
कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेश सरस्वतीला वंदन करून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे व लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्य्क्ष श्री. एस. जी चव्हाण, डिस्ट्रिक्टचे जीएसटी चेअरपर्सन ला. विजय गणत्रा आणि डिस्ट्रिक्टचे युथ एम्पॉवरमेंटचे ला. नयन कवले , एनआयपीएम चे अध्यक्ष श्री. किशोर शेळके व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.. व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शॉल देऊन स्वागत करण्यात आले. ..
रोजगार मेळाव्यामध्ये ३५० उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेय त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ६५ मुलांना शॉर्टलिस्ट केले आहे... आणि १५ ते २० मुलांना लगेचच कामावर रुजू होण्यास सांगितले आहे...
लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष एस. जी चव्हाण यांनी आपलया वक्तव्यात सांगितले कि २९ कंपन्यांनी रोजगार मेळाव्यामध्ये भाग घेतला आहे. आणि ज्या ३५० उमेदवारांनी ऑनलाईन नावं नोंदणी केलिय आणि जे तरुण इथे उपस्थित आहेत त्या तरुणांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन लगेचच त्यांच्या पात्रतेनुसार कंपनीत नियुक्त केले जातील..
प्रितम म्हात्रे यांनी वक्तव्यात असे म्हटलेय कि, हा रोजगार मेळावा अवघ्या २ ते तीन दिवसात राबवण्यात आला, गावोगावी फिरत असताना अस लक्षात आले कि आम्हाला फक्त नोकरी द्या हा एकच शब्द सगळ्यांचा होता त्यामुळे इथे प्रत्येक तरुणाला रोजगार व नोकरी मिळाली पाहीजे केवळ हा प्रामाणिक हेतू हा रोजगार मेळावा भरवण्यामागे आहे. आणि जर हे काम आपल्या जवळपासच्या ठिकाणी लागले तर आपला वेळ वाचेल त्रासही वाचेल त्यामुळे एस जी चव्हाण यांनी आपल्याला एकूण ४०० जागा उपलब्ध करून दिल्यात . त्यादृष्टीने रोजगार मेळावा फायदेशीर ठरेल. तसेच जो एअरपोर्ट येतोय त्यांच्यामार्फत जे प्रशिक्षण केंद्र सुरु केलय त्यात कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही. त्यामध्ये ४५ जणांना लेटर देऊन दिल्लीला पाठवण्यात आलेय... यामध्ये माध्यम फक्त मी आहे मेहनत तुम्हाला करायची आहे त्यासाठी श्री चव्हाण साहेबांची मदत त्यांना लागेल असेही म्हटले आहे...रो
जगार मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीना सन्मानचिन्ह देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच जे उमेदवार सिलेक्ट झाले आहेत त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते लेटर देऊन त्याचेही सत्कार करण्यात आले...
.jpg)


