महाराष्ट्र वेदभुमी

विद्यासागर कला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस आयोजन


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- विद्यासागर कला महाविद्यालय खैरी बिजेवाडा, रामटेक येथे भारताचे अकरावे राष्ट्रपती तसेच महान वैज्ञानिक मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला....

संपूर्ण देशात डॉ.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन करण्यात येते...विद्यासागर कला महाविद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश सोमकुवर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठी विभाग प्रमुख गिरीश सपाटे यांनी मार्गदर्शन केले... व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ.रवींद्र पानतावणे तसेच कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथपाल डॉ.आशिष ठाणेकर उपस्थित होते...

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांवर आपले विचार व्यक्त करून डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली व्यक्त केली... डॉ.गिरीश सपाटे यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि व्यक्तित्वाचा आपल्या मार्गदर्शनातून आढावा घेतला. आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. सुरेश सोमकुवर यांनी विद्यार्थ्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या अभ्यासातून आणि व्यासंगातून निर्माण झालेल्या त्यांच्या व्यक्तित्वाचे विद्यार्थ्यांनी अवलोकन करून आपल्या जीवनात वाचनाचे महत्त्व प्रस्थापित केले पाहिजे असे विचार व्यक्त केले... कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.आशिष ठाणेकर यांनी करून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी तसेच वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना उलगडून दाखवले...

याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.अनिल दाणी, डॉ.ज्योती कवठे डॉ.सतीश महल्ले डॉ. विलास जायभाये, प्रा .गंगा मोंढे तसेच विद्यार्थीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागरीका चरडे हीने केले...

Post a Comment

Previous Post Next Post