महाराष्ट्र वेदभुमी

कुंडलिका नदीपात्रात टाकला जातो घनकचरा यावर कारवाही कोण करणार ?


कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यात नामवंत असलेली तसेच बारमाही वाहणारी त्याच बरोबर भरती ओहटीची परंपरा लाभलेल्या कुंडलिका नदीपात्रात टाकला जातो घनकचरा यावर कारवाही कोण करणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे तर नदीपात्रात घनकचरा टाकल्याने असंखे नागरीकांना दूषित पाण्याला सामोरे जावे लागत आहे...तसेच तीरावर अनेक गावे वसलेली देखील आहेत आणि रोहे शहरासह असंख्ये गावांना या नदीतून पाणी पुरवठा केला जात असल्याने नदीपात्रातून वाहत असलेला वेगवेगळा घनकचरा तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून त्यात अनेक व्यावसायिक, भाजीवाले, फळ विक्रेते, चिकन दुकाने, मटण दुकाने या सर्वांचा जो काही घनकचरा आहे तो सर्रासपणे या नदीपात्रामध्ये फेकला जात असल्याचे बोंब सुरू झाल्याने त्याला नक्की जबाबदार कोण यावर जलसंपदा विभागाच्या वतीने कोणती कारवाही केली जाईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे...

ज्या कुंडलिका नदी पात्रावर रोहे शहर वसलेले आहे त्यासोबतच कोलाड पासुन रोहा पर्यंत काही गावे वसलेली आहेत तसेच लाखो नागरिकांची तान भागवणारी ही कुंडलिका नदी तसेच कुंडलिका नदीच्या पाण्यावरती अनेक जणांचे उदरनिर्वाह भातशेती बरोबर विविध प्रकारचे जोड व्यवसाय तसेच उद्योग व्यवसाय चालतात.आणि त्याच पाण्यात कोलाड ते पाले बुद्रुक दरम्यानच्याच या नदीपात्रात मोठ्या प्लास्टिक पिशवीमध्ये चिकन वेस्ट ने भरलेल्या बॅग नदीमध्ये फेकण्यात आल्या आणि त्या वर तरंगताना दिसून येतात...त्यामुळे या नदीचा पाणी दूषित पाण्यामुळे जगणाऱ्या अनेक नागरिकांना त्याचा गंभीर त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचे गांभीर्य संबधीत अधिकारी प्रशासक यांनी घेतले पाहिजे अशी मागणी केली जात आहे...


प्रतिक्रीया 

कोलाड परिसर आणि रोहा परीसरात गणपती उत्सव काळात निर्माल्यामुले नदीचे पाणी दूषित होऊ नये म्हणुन कोलाड येथील स्थानीक रेस्क्यु टीमच्या माध्यमातुन सर्वत्र निर्माल्य संकलन करण्याचे काम या टीमच्या माध्यमातुन कऱण्यात आले त्यांनी दक्षता घेत त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. परंतू रोह्यापर्यंत अनेक गाव व शहर या नदी काठावरती वसलेली आहेत कोलाड मधील अनेक व्यावसायिक,भाजीवाले, फळवले विक्रेते,चिकन दुकाने या सर्वांचा जो काही कचरा आहे तो सर्रासपणे या नदीपात्रामध्ये फेकला जातो यापासून नदीची पाण्याची गुणवत्ता फार दूषित होत चालली आहे तसेच जैवविविधतेवर याचा फार मोठा घात होत आहे. या नदीमध्ये अति दुर्मिळ माशांच्या प्रजाती आढळून येतात त्या फक्त आणि फक्त आपल्या कुंडलिका नदी मध्येच आढळतात,अशा जीवांचे अस्तित्व संकटामध्ये आले असून अनेक गावांना याच नदीपात्रातून पिण्याचे पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे नागरिकांनी घनकचरा नदीपात्रात न टाकता त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे. आपली सर्वांची तहान भागवत असलेली ही नदी अशातच आपण या नदीचा बचाव करण्यामध्ये कमी पडत आहोत का? हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहत आहे...

.... डॉ मंगेश सानप सामाजिक कार्यकर्ते कोलाड.

Post a Comment

Previous Post Next Post