महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुका महिला माथाडी कामगार अध्यक्षपदी तृप्ती बामणे यांची नियुक्ती



प्रतिनिधी :- सत्यप्रसाद आडाव चणेरा

 नुकतीच राज्य माथाडी कामगार व जनरल  कामगार संघटनेचे नुकतीच पेन येथे बैठक पार पडली . या बैठकीत रोहा  महिला तालुका  माथाडी कामगार व जनरल कामगार  अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती बामणे त्यांची निवड करण्यात आली...

             अध्यक्ष रवींद्र केदार , कार्याध्यक्ष कैलास पाटील, सचिव राजेश महाडिक यांनी प्रदान केले . तसेच यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष शितल माळी, जिल्हा कार्याध्यक्ष नोकित पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्षा  तृप्ती बामणे यांना  नियुक्तीपत्र देण्यात आले . त्यांच्या या निवडीबद्दल  रोहा तालुक्यातील विविध स्तरातून  अभिनंदनचा वर्षाव होत आहे... 

                 यावेळी प्रतिक्रिया देताना तृप्ती बामणे यांनी सांगितले की, माझी जी आज निवड तालुकाध्यक्ष म्हणून करण्यात आली त्याबद्दल वरिष्ठांचे मनापासून आभार तर या पुढे माथाडी कामगार तसेच इतर घटकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के मिळून जाण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला...

Post a Comment

Previous Post Next Post