महाराष्ट्र वेदभुमी

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार


वाघानी  घेतला आणखी एक बळी

शरीराचे अक्षरशः केले भक्षण 

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- देवलापार या आदिवासीबहुल भागातील आणखी एक शेतकरी वाघाचा बळी ठरलेला आहे... वाघाने नुसते मारलेच नाही तर त्याचे भक्षणही केल्याने अनेकांच्या अंगावर शहारे आलेले आहेत... सुखराम गुंटु सर्याम, वय ५५ रा. मौजा जमुनिया टोयापार असे मृतात शेतकऱ्याचे नाव असून ते  दि. १५ ऑक्टोबरच्या रात्रीच्या सुमारास शेतावर जाताना ही घटना घडली... मात्र ती १६ऑक्टोबरला सकाळी साडेआठ नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली...

टोयापार बफर झोन मधील कंपार्टमेंट नंबर २४६ पीएफ येथे सदर घटना घडली... ज्या ठिकाणी वाघाने सुखराम यांच्यावर हल्ला केला त्या ठिकाणाहून जवळपास ५०० मीटर अंतर पर्यंत वाघाने त्यांना फरफटत नेले... वाघाने घेतलेल्या बळीच्या गेल्या काही महिन्यात अनेक घटना या भागात घडल्या.. मात्र तरीही वन विभागांनी ठोस अशी कोणतीही उपाययोजना केलेली नाही... हे इथे एक शोकांतिकात म्हणावी लागेल... परिणाम स्वरूप शिवसैनिक नागरिकांमध्ये वन विभाग तथा शासनाप्रती रोष वाढतच आहे.. त्याचा उद्रेक केव्हा होईल याचीही शाश्वती सद्यस्थितीत देता येत नाही... वन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे हा बळी गेलेला असल्याची ओरड सध्या नागरिकांमध्ये आहे... घट्ट ची माहिती मिळताच व नागरिकांचा रोष बघता डीएफओ प्रभुनाथ शुक्ला यांनी घटनास्थळी भेट दिली असता संतापलेल्या लोकांनी ' चर्चा नाही काम चालू करा ' असे बजावले व तशी मागणी सुद्धा रेटून धरली... आश्चर्यजनक बाब म्हणजे डीएफओ यांच्याशी चर्चा सुरू असतानाच समोरच दोनशे मीटर अंतरावर नरबळी घेणारा तो वाघ दिसून आला... हे पाहता डीएफओ प्रभुनाथ शुक्ला यांनी तात्काळ वाघ पकडणार्यांची टिम बोलवुन वाघ पकडण्यासाठी पाठवले व कंपाऊंडचे काम चालु करण्यासाठी जेसीबी बोलवण्यात आली. यानंतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला...

Post a Comment

Previous Post Next Post