वरिष्ठांनी सहा वर्षासाठी केले निलंबन
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- भाजप चे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना पक्षश्रेष्ठींकडून तब्बल सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेले आहे दि. १५ ऑक्टोबरला शहरातील दीप हॉटेल येथे पार पडलेल्या पत्र परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली...
भारतीय जनता पार्टीचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी रेड्डी यांच्या निलंबनाचे पत्र काढलेले आहे.. पत्र परिषदेत रेड्डी यांनी ते पत्र दाखवत माझे सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आलेले असल्याची माहिती दिली... सदर पत्रामध्ये मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या तथा पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे... मुख्यमंत्र्यांबद्दल मी फक्त माझे मत व्यक्त केले होते, आपले मत सांगणे हे चुकीचे नाही...कुणाच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे याची जाणीव मला आहे याचे विपरीत परिणाम होणाऱ्या निवडणुकीत दिसतीलच असेही ते बोलले...
कोणत्याही परिस्थितीत जयस्वाल यांना आम्ही निवडणुकीत पाठिंबा देणार नाही... रेड्डी यांनी चांगल्या क्वालिटीची विकास कामे केलेली आहेत अशी रेड्डींची लोकांमध्ये ओळख आहे मात्र भारतीय जनता पार्टीने माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर केलेल्या या कारवाईमुळे जणू सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहे. सदर पत्रकार परिषदेत करीम मलाधारी, विनायक बांते, नंदकिशोर कोहळे, भोला वघारे, सुखदेव शेंद्रे, ब्रह्मानंद नेवारे, सह पदाधिकारी उपस्थित होते..
