महाराष्ट्र वेदभुमी

पत्रकार उत्कर्ष समितीचा नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न


पनवेल (मिलिंद खारपाटील) : पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार समितीच्या वतीने नवरात्री सणाच्या निमित्ताने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान सोहळा कार्यक्रम पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात मोठ्या दिमाखात व थाटामाटात पार पडला... 

पत्रकारिता , शासकीय वैद्यकीय अधिकारी,  शासकीय नर्सिंग स्टाफ , पोलीस दलातील महिला अधिकारी,  कलाक्षेत्र,  गायन क्षेत्र,  कलाकार,  नृत्य क्षेत्र , आशा वर्कर , उद्योजिका शिक्षिका व स्वच्छता कर्मचारी  अशा नवू क्षेत्रातील राज्यभरातील ३६ महिलांना यावेळी नवदुर्गा सन्मान देऊन गौरविण्यात आले... 

आपापल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजहित जपणाऱ्या , महिलांचे स्वावलंबन संरक्षण आरोग्य शिक्षण प्रबोधन मनोरंजन यासारख्या कार्यात ठसा उमटवत आपले अमूल्य योगदान देणाऱ्या या नवदुर्गांना पत्रकार उत्कर्ष समितीने सन्मानित केले...

पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा डॉक्टर स्मिता पाटील,कार्याध्यक्ष श्रुती उरणकर, सचिव एडवोकेट दिव्या लोकरे, उपाध्यक्ष आरती पाटील या पंच ज्योतींच्या हस्ते वर उल्लेखित नवदुर्गांना सन्मानित करण्यात आले... 

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमास सचिव डॉक्टर वैभव पाटील खजिनदार शैलेश ठाकूर सहसचिव ज्ञानेश्वर कोळी सदस्य रोहिदास जाधव सदस्य दिलीप गायकर यांचे मोलाचे योगदान या कार्यक्रमास लाभले... 

 रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद खारपाटील , नवी मुंबई अध्यक्ष निलेश उपाध्याय , पनवेल अध्यक्ष अशोक घरत , सदस्य आदित्य वाघ, मीडिया प्रभारी लालचंद यादव यांनी या कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली...

Post a Comment

Previous Post Next Post