महाराष्ट्र वेदभुमी

वाघाच्या हल्ल्यात महीलेच्या शरीराचे दोन तुकडे

पवनी वनपरीक्षेत्रातील झिंझेरिया शेतशिवारातील घटना


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- : तालुक्‍यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या पवनी परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरूच आहे... महिन्यापासून एका ईसमाला जखमी तर एका महीलेला वाघाने ठार केल्याची घटना देवलापर भागातील झिंजरिया शेत शिवारात दुपारी साडेपाच दरम्यान घडली... हा भाग पवनी वनपरिक्षेत्राचे बफर झोन मध्ये येतो...५५ वर्षीय महिला मीताबाई बुध्दु कुंभरे शेतात निंदन करत असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला चढविला व तिला फरफटत जंगलात नेले व तिला ठार मारून तिचे दोन तुकडे केल्याची घटना १८/९/२०२४ ला दुपारी साडेपाचच्या सुमारास घडली...

   मीताबाई बुध्दु कुंभरे रा झीझेंरीया वय ५५ वर्ष असे मृतक महिलेचे नाव असून ती व तिचा पती जंगलाला लागून असलेल्या त्यांच्या शेतामध्ये निंदन (गवत काढणे)करण्यासाठी गेलेले होते... सिंदेवानी येथील हा भाग पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत बफर झोनला लागून येतो... महिला निंदन (गवत काढणे) करीत असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला व तिला फरफटात जंगलाकडे नेले व येथे महिलेला ठार मारून तिचे दोन तुकडे केले यावेळी धड वेगळे होते तर शीर वेगळे होते.. घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली तोच तेथे लोकांचा लवाजमा उपस्थित झाला... आरडा ओरड सुरू झाली महिलेला कुठे नेले आहे हे कळेनासे झाले होते...सायंकाळ होऊनही वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली नव्हती त्यामुळे लोकांचे यावेळी उग्ररूप होण्यास सुरुवात झालेली होती... वन विभागाचे टीम येत पर्यंत भीतीपोटी लोकांनी काड्यांना आग लावून त्यामध्ये वेळ काढला....

वारंवार वन्य प्राण्यांचे मानवावर होणारे हल्ले यामुळे लोक अगोदरच खूप संतापलेल्या मुद्रेमध्ये आहे भरीस भर म्हणजे आजच्या या घटनेने नागरिक स्वतःला असुरक्षित समजत आहे... तथा धास्तावलेले सुद्धा आहे तसेच विशेष म्हणजे लोकांची वन विभागावर खूप मोठी नाराजी आहे वन विभागाच्या विविध उपाय योजना फोल ठरत आहे... शोकांतिका म्हणजे आजच्या घटनेमध्ये ठार झालेल्या महिलेचा मुलगा हा अपघातामध्ये मरण पावला सध्या ही महिला आणि तिचा पती असे दोघेच आपला संसारगाडा चालवत होते आता महिलेच्या मृत्यूने तिचा पती एकटाच राहिलेला आहे तेव्हा त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे...

वाघाचा बंदोबस्त करा

परिसरात वाघाने बळी घेतल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे... वनविभागाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहे... या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतीचे कामे करता येतील, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे...आजच्या घटनेबाबत वनविभागाच्या नीस्काळजीपनाने महीलेचा जीव गेला असे गावातील लोकांचे मत आहे... घटना घडल्यावर मोठा कालावधी निघून गेल्यावरही वन विभागाचे कोणतेच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते हे उल्लेखनीय...

Post a Comment

Previous Post Next Post