महाराष्ट्र वेदभुमी

उपबाजार देवलापारमध्ये व्यापार करण्यासाठी खुले जाहीर आवाहन : सचिन किरपान

देवलापर येथे सुरू होणार "क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा मार्केट यार्ड"


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक:- रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देवलापार येथील उपबाजार आवारात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा सभापती सचिन किरपान यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाचा मानस असून उपबाजार देवलापर येथे लवकरच क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा मार्केट यार्ड सुरू करण्यात येणार आहे... यात विशेषता बकरा मंडी व भाजीपाला बाजार आदिवासी भागातील शेतकर्‍यांच्या हितासाठी सुरु करण्यात येत आहे... त्या दृष्टीने उपबाजाराला भव्य गोदाम व व्यापारी, आडतियांना बोली करण्यासाठी लिलाव शेड अशी अनेक विकासकामे या आवारात लवकरच करण्यात येणार आहेत असे पत्रकार परीषद मध्ये सांगण्यात आले...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने देवलापार व आदिवासी बहुल भागातील सुमारे ७५ गावांना त्यांच्या भागात हक्काची बाजारपेठ नाही... या भागातील शेतकऱ्यांना त्यांचे कृषी उत्पादन विक्री करण्यासाठी रामटेक, तुमसर किंवा नागपूर येथील कळमना येथे आपला माल न्यावा लागतो यात त्यांचा वेळ व पैसा दोहोंचा अपव्यय होतो हे लक्षात घेऊन देवलापार येथील उपबाजारात धान्य बाजार, भाजीपाला बाजार, गुरांचा बाजार, बकरा मंडी सुरू करण्यासाठी सभापती सचिन किरपान यांनी पुढाकार घेतला आहे... याशिवाय या उपबाजार बकरा मंडी व गुरांच्या बाजारासाठी आवश्यक असलेले रॅम्प व शुद्ध पाण्याचे हौद बांधकाम केले जाणार आहे...यासोबतच तिथे विद्युत व्यवस्था, सुलभ शौचालय व पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करण्यात येईल...

आदीवासी भागातील लोकांच्या सुख सोयीसाठी योग्या मिळण्यासाठी, भाजीपाला बाजाराची सुरुवात होणार आहे... या उपबाजारासाठी व्यापारी व आडतीया व्यापार करण्यासाठी भागातील इच्छुकांनी व इतर व्यक्तींनी लायसन्स साठी कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क करण्यात यावा, असे खुले जाहीर आव्हान रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीनी केलेले आहे... असे सभापती सचिन किरपान यांनी सांगितले. आगामी काळात देवलापार येथे उपबाजारात सेवा सहकारी संस्था देवलापारच्या माध्यमातून व शासनाच्या १०० टक्के अनुदानावर ६००० वर्गफूटाचे भव्य गोदाम उभारणीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे... तेही काम लवकरच पूर्ण होण्याची माहिती सचिन किरपान यांनी पत्रकार परिषदेत दिली... पत्रपरिषदेत त्रिलोकचंद मेहर, नकुलजी बरवटे, वीरेश आष्टणकर,भीमराव आंबीलडुके, सचिव हनुमंता महाजन उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post