महाराष्ट्र वेदभुमी

नेरूळ रेल्वेस्थानकाबाहेर राजरोस मद्य,अवैध वस्तुंची विक्री,कारवाईसाठी स्वाक्षरी मोहिम आयोजन

 वारंवार पत्रव्यवहार करुन महानगरपालिके कडून असमाधान कारक कारवाई 

नागरिकांनी दिला आपल्या सह्या करुन स्वराज्य स्वाक्षरी आंदोलनास पाठिंबा


नवी मुंबई (नेरुळ प्रतिनिधी) :नवी मुंबई मधील नेरूळ रेल्वे स्थानका बाहेर स्वराज्य पक्षाच्या वतीने सार्वजनिक परिसरात चालू असलेली मद्य विक्री व उघड़यावर पीत बसलेल्या तळीरामावर कारवाई होन्यासाठी त्याचप्रमाणे हया आवारात रात्रभर चालू असलेली अवैध वस्तुंची विक्री व फुटपाथवर असलेल्या फेरीवाल्यावर क़ायमस्वरूपी कारवाई होण्याबाबत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते... ही स्वाक्षरी मोहीम दिनांक १९/९/२०२४ व २०/९/२०२४ हया  दिवशी आयोजित केली होती...


हया स्वाक्षरी मोहिमेत अनेक हजारो महिलानी - नागरिकानी आपल्या सह्या करुन हया स्वराज्याच्या स्वाक्षरी आंदोलनास पाठिंबा दिला... अनेक महिलानीं त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न कसे भेड़सावत आहेत, त्यानी आपल्या संतप्त भावना हया आंदोलनात व्यक्त करत होते, रोज़ स्टेशन परिसरात महिलाना धक्काबुक्की, शिवीगाळ, चोरी, छेड़छाड़ अशा गुन्ह्यांना सामोरे जावे लागत आहे. ह्याच परिसरात खून, दरोड़े, अवैध वस्तुंची विक्री ही सरासपणे चालू आहेत. हे सर्व होत असताना पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, विभाग अधिकारी हया गुन्ह्यावर, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. सर्व प्रशासन, मद्य विक्री दुकानदार व फेरीवाले हया सर्वांची हातबांधनी आहें की काय असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकाना पड़त आहे.स्थानकानज़दीकचे फेरीवाले हे राजकीय दलालाना दिवसाचे ३००-५०० रुपये देऊन आपल्या हातगाड्या लावताना दिसत आहे...

स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष, आंदोलनकर्ते श्री. स्वप्निल घोलप हयानि गेले दिड वर्षापासून सर्व पोलीस प्रशासन, सिडको प्रशासन, महानगरपालिका हयांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करुन सुद्धा समाधानकारक कारवाई त्या ठिकानी होताना दिसत नाही म्हनून स्थानकाच्या परिसरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी व शहराच्या स्वच्छतेसाठी आता अंतिम लढ़ाई च्या उद्देशाने ही स्वाक्षरी मोहिम घेन्यात आली...

स्वराज्याचे आंदोलनकर्ते श्री. स्वप्निल घोलप हयानी ज़ाहिररित्या सर्व नागरिकाना आहवान केले की आपण जो आज स्वाक्षरी मोहिमेला पाठिम्बा दिला आहे त्याला कुठेही तड़ा ज़ाऊ देनार नाहीं, हया सर्व स्वाक्षरी चे निवेदन महानगरपालिका आयुक्त, सिडको संचालक, पोलीस आयुक्त हयाना देनार आहोत. येत्या १५ दिवसात हे प्रश्न सुटले नाहीं तर मोठ जनआक्रोश आंदोलन नेरुल स्थानकावर पुकारनार आहोत असे त्यानी ठामपणे सांगीतले...

हया मोहिमेत स्वराज्याचे सर्व पदाधिकारी गणेश माने, रवि दाभोलकर, दत्ता फ़ड़तरे, स्वप्निल धनावडे, नितिन पवार, मारुति निकम, ओंकार किरदत, प्रज्योत मूले आदि नी नियोजन केले होते...

Post a Comment

Previous Post Next Post