महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड विभागात ७८० दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन,तर २५४ लक्ष्मी-गौराईचे मंगळवारी आगमन.


कोलाड (श्याम लोखंडे) : कोलाड खांब विभागातील दीड दिवसांच्या बाप्पांचे आज रविवारी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत ढोल ताशांच्या तसेच टाळ मृदंगाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत भावपुर्ण निरोप देत घरगुती गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले... शनिवारी ७ सप्टेंबर रोजी बाप्पांना मंगलमय वातावरणात सिंहासनी विराजमान कऱण्यात आलेल्या दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले ढोल, ताशांच्या आणी टाळ, मृदुंगाच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत भक्तगणांनी अवडत्या बाप्पाला निरोप दिला... यावेळी विसर्जन स्थळांवार सर्वत्र मोठी गर्दी करत टाटा करत निरोप देण्यात आला...


कोलाड विभागात शनिवारी ७ सप्टेंबर रोजी एकूण १९६८ घरगुती गणपती बाप्पांचे आगमन झाले होते तर घरगुती खाजगी ७८० दिड दिवसांच्या बाप्पांचे रविवारी भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले असून मंगळवारी १० सप्टेंबर रोजी या विभागात एकूण २५४ लक्ष्मी गौराई चे घरगुती आगमन होणार आहे...

रोहा तालुक्यातील कोलाड विभागात भावपुर्ण वातावरणात दिड दिवसांच्या घरगूती ७८० बाप्पांचे विसर्जन करण्यात आले... कोलाड पोलीस स्टेशन हद्दीत सार्व ९ व खाजगी तर घरगुती १९५९ असे एकूण १९६८ गणेश मूर्तींचे शनिवारी मोठ्या उत्साहात बाप्पांचे आगमन झाले, तर रविवारी ढोल, ताशांच्या आणी टाळ, मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या, उंदीर मामा की जय,एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जयजयकार उंदीर मामा की जय बाल गोपाळ भक्तगण म्हणत गणेश भक्तगणांनी आपल्या लाडक्या बाप्पाला व दीड दिवसांनी ७८० बाप्पांना निरोप दिला...

यावेळी या विभाग परिसरातील गाव ग्रामस्थ नागरिकांनी गणपतीपूर्वीच विसर्जन घाट व जाणारा मार्ग तसेच तलाव व नदी परिसर स्वच्छता करण्यात आली होती. दुपारी चार वाजल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत वाजत गाजत तर काही गुलाल उधळत, लेझिम, टाळ मृदुंग, ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती... एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी आपल्या परिसरातील नदी किनारी व तलाव ठिकाणी निघाले होते. तत्पुर्वी कोलाड पोलिस प्रशासनाच्या वतीने कायदा सुव्यवस्थेचा पालन म्हणून दुपारपासूनच कोलाड विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे रहावेत यासाठी गस्त घालण्यात आली होती..

कोलाड परिसरातील कोलाड सुतारवाडी खांब विभागातील दीड दिवसाचे गणपती खाजगी ७८०, पाच दिवसाचे खाजगी ११३८ सात दिवसांचा १ तर दहा दिवसांचे ४० घरगुती गणपती आहेत तर ९ सार्वजनिक मंडळाचे गणपती असून उद्या मंगळवारी २५४ गौरींचे आगमन होणार आहे...

सदर गणेशोत्सव काळाच्या मध्ये कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील आठ महत्त्वाच्या ठिकाणी कोलाड पोलिस निरिक्षक नितीन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली १५ पोलीस अंमलदार तसेच होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे हद्दीतून जाणाऱ्या मुंबई गोवा हायवेवर वाहतूक विभागाचे पोलीस तसेच कोलाड पोलिस ठाण्याकडील १५ पोलीस अंमलदार वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याची दक्षता घेत ही पथक विविध ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती कोलाड पोलिस सूत्रांकडून मिळाली...तर विशेषतः यावेळी एक अनोखा उपक्रम बाप्पा विसर्जनस्थळी कोलाड विभागातील रेस्क्यूटीम एस व्ही आर एस एस यांच्या वतीने सर्व निर्माल्य एकत्रित संकलित करून ते विशेष ठिकाणी संकलित करण्याची पाठविण्यात आले असे छान उपक्रम या टीमच्या माध्यमातून केल्याने त्यांचे कौतुक होत असल्याचे दिसून आले...

Post a Comment

Previous Post Next Post