महाराष्ट्र वेदभुमी

बकरी चारणाऱ्या इसमाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यु


पुगांव (नंदकुमार कळमकर्) :  रोहा तालुक्यातील गोवे आदिवासीवाडी वाडी येथील इसम दौलत रामु वाघमारे हा गोवे गावाच्या हद्दीत शनिवार दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी ४ वाजण्याच्या सुमारास गोवे गावाच्या हद्दीतील रेल्वे ट्रकच्या बाजूला बकऱ्या चरण्यासाठी गेला असता रोहा बाजुकडून कोलाड बाजूकडे जाणाऱ्या मालगाडीने  सदर इसमाला जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्यामुळे मृत्यु झाला...

              सदर अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते घटना स्थळी दाखल झाले.त्यांच्या मार्गदर्शना खाली आबा गायकवाड अधिक तपशील तपास करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post