अलिबाग (ओमकार नागावकर) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महिला आघाडीचा भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन दि.२६ रोजी संस्कार साहेबांचे, शिवसेना जिल्हा कार्यालय चौल, तुलाडदेवी येथे करण्यात आले होते... रायगड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभमीवर हा मेळावा घेण्यात आला...
या मेळाव्यात मुंबईहून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निरीक्षक राजापूर तालुका संपर्क संघटक सौ.समिक्षा सक्रे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक सौ.नेहा माने, मा.सिंधुदुर्ग जिल्हा संघटक, माजी उपसभापती पं.स.कुडाळ सौ.श्रेया परब, मा.महापौर, पुणे शहर संपर्क संघटक सौ. स्नेहल आंबेकर या मार्गदर्शन करण्याकरीता उपस्थित राहिल्या होत्या...
महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांचा राजकीय व समाजिक सहभाग वाढविणे गरजेचे आहे.. तसेच स्वतःच्या हक्कांबद्दल, अधिकारांबद्दल अधिक जाणकार होण्यासाठी समाज माध्यम व तंत्रज्ञानाचा शिकाऊ वृत्तीने वापर करणे आवश्यक आहे...जेणेकरून महिला आपले प्रश्न व समस्या अशा व यासारख्या मध्यवर्ती मेळाव्यात मांडू शकतील असे आवाहन निरीक्षकांनी महिलांशी संवाद साधताना केले...
यावेळी रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विधानसभा प्रवक्ते धनंजय गुरव, महिला जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, जिल्हा संपर्क संघटिका सौ.शिल्पा घरत, उपजिल्हा संघटिका सौ. दर्शना पाटील, विधानसभा संघटिका सौ.तनुजा पेरेकर, अलिबाग तालुका संघटिका सौ.स्नेहल देवळेकर, तालुका संघटिका सौ.लीना घरत, मुरुड तालुका संघटिका सौ.राजश्री मिसाळ व शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या...