महाराष्ट्र वेदभुमी

झिराड हद्दीत क्षुल्लक कारणावरून जीवे ठार मारण्याचा धक्कादायक प्रयत्न,

मांडवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस केली अटक,


सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील झिराड हद्दीतील मु. झिराडपाडा येथे एकाने भाजी कापण्याच्या सुरीने डाव्या कुशीत मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली आहे...

         याबाबत मांडवा सागरी पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, झिराड हद्दीतील मौजे झिराडपाडा हद्दीत पोतदार बंगला येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मोलमजुरीचे काम करणारे व एका पत्र्याच्या खोलीत एकत्र राहत असलेले फिर्यादी बलदेव परमेश्वर मलिक व आरोपी सदानंद गुमुस्ता मलिक सध्या मौजे झिराडपाडा, झिराड, मूळ रा. केंदुपटी, ता. खरीहार, जि. नवापारा, राज्य-ओडीसा, हे दोघे मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास खोलीत एकत्र होते. यावेळी फिर्यादी बलदेव परमेश्वर मलिक याने आरोपी यास जोरजोरात बडबड करू नको, असे सांगितले असता आरोपी सदानंद गुमुस्ता मलिक याला राग आला व त्याने भाजी कापण्याच्या सुरीने फिर्यादी बलदेव परमेश्वर मलिक याच्या डाव्या कुशीत मारून गंभीर जखमी केले. जखमी फिर्यादीला इतर सहकाऱ्यांच्या साहाय्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे...

          याबाबत फिर्यादी याने बुधवार दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वा. ९ मी. च्या सुमारास मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीवर म.पो.हवा. ए. व्ही. करावडे यांनी गुन्हा रजि.९१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे १०९,(१), ३५१(२)(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपी याला गुरुवार दि.२६/सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा सागरी पोलीस निरीक्षक दिपक आर. भोई यांच्या नेतृत्वाखाली पो.स.ई. सुमित खोत हे अधिक तपास करत आहेत...

छायाचित्र - आरोपी : सदानंद गुमुस्ता मलिक

Post a Comment

Previous Post Next Post