कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तांबडी घोसाळे मार्गावर हनुमान टेकडी ते तांबडी दरम्यानच्या मार्गांवर शनिवारी पहाटे अचानक दरड कोसळण्याची घटना घडली तर या घटनेमुले मार्गावर मोठे दगड गोटे माती आल्याने एकच खळबळ उडाली मात्र सदरच्या घटनेत कोणतेही हानी झाली नसल्याचे समजते परंतू या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती...
गेली तीन चार दिवस रोहा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे तर सदरच्या पावसात रोहा हनुमान टेकडी मार्गाच्या तांबडी घोसाळे मुरूड कडे जाण्याच्या मार्गावर तसेच हनुमान टेकडी च्या २ किलो मिटर वर तांबडी कडे जाणार्या मार्गावर अचानक दरड कोसळली त्यामुळे रस्त्यावर दगड गोटे माती आल्याने हे मार्ग बंद करून पर्यायी मार्गावरुन वाहने वळविण्यात आली होती तर घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी सदर बाबत संबधीत बांधकाम खात्याला दिले.तद्नंतर तत्काळ यावर या विभागाच्या वतीने उपाय योजना करत हे दगड गोटे माती बाजूला केले आणि काही कालावधी नंतर पुनः हा मार्ग वाहतकीसाठी मोकळा करण्यात आला...
तर सातत्याने या मार्गावर दरड कोसळण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ झाली आहे तर दगड गोटे माती मार्गावर येत असल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ते धोकादायक असल्याचे बोलले जात आहे तसेच या मार्गाची देखील पावसात दुरवस्था झाली असून साईट पट्ट्यांची अवस्था अधिक गंभिर झाली असल्याने यावर संबधीत खात्याकडून लवकरात लवकर ठोस उपाय योजना करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे...