मेळाव्यात २००० महिलांची उपस्थीती
रामटेक:- भारतीय जनता पार्टी, महिला आघाडी रामटेक शहराच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी सन्मान कार्यक्रम व भव्य महिला मेळावा रामटेकच्या गंगाभवनम सभागृहात पार पडला...क
अध्यक्षस्थानी भाजपाचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी होते... प्रमुख पाहुने म्हणून नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर, डाँ. कल्पना पांडे महीला आघाडी जिल्हा अध्यक्ष अनुराधा अमिन, जिल्हा भाजप चे उपाध्यक्ष संजय मुलमुले, राजेश ठाकरे, तालुका अध्यक्ष राहुल किरपान, विधानसभा संयोजक सुधाकर मेघंर, जि. प. सदस्य सतीश डोंगरे , माजी नगराध्यकक्ष दिलीप देशमुख, प्रकाश वान्ढे, शहर अध्यक्ष उमेश पटले, माजी उपाध्यक्ष आलोक मानकर, महिला आघाडी जिल्हा महामंत्री रेखा दुनेदार, युवा मोर्चा अध्यक्ष धर्मेन्द्र शुक्ला यांची प्रामुख्याने उपस्थिती होती...
महिलाच्या सक्षमीकरणा करीता भारतीय जनता पार्टी सातत्याने पुढाकार घेत असुन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याचाच एक भाग आहे... ही योजना सर्व बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कल्पकतेतून सुरू झालेली योजना असून महाराष्ट्रत भाजप सरकार असे पर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे प्रतिपादन माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी व्यक्त केले... रेड्डी यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामाचाही भाष्य करीत आमदार असताना व रामटेक नगरपालिकेत भाजपाची सत्ता असतांना शहरात विकास योजनांचा धडाका सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले... महिलाकरीता शासनाच्या अनेक योजना सुरू असुन लेक लाडकी योजना, उज्वला गॅस योजना, महिला बचत गटाचे सक्षमीकरण त्याचाच एक भाग असल्याचे ही रेड्डी यांनी सांगितले...
महिला मेळाव्याचे प्रास्ताविक शहर महिला आघाडी अध्यक्ष चित्रा धुरई यांनी, संचालन माजी नगरसेविका उज्वला धमगाये यांनी व आभार प्रदर्शन माजी नगरसेविका शिल्पा रणदिवे यांनी मानले...माजी नगरसेवक वनमाला चौरागडे , कविता मुलमुले,पदमा ठेगरे , प्रवीन मानापुरे, अनिता टेटवार, रत्नमाला अहिरकर, ज्योती कोल्हेपरा, नेहा गावण्डे, सतीश दुनेदार, सुधीर सेलोकर, अर्चना ठक्कर, श्वेता गोन्नाडे, रोहिणी नागोसे, ललिता बावनठडे, रश्मी गोन्नाडे , तेजस्विनि चंदेल, अपेक्षा धमगाये सह भाजप, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते... महिला मेळाव्याला शहरातील दोन हजार महिलानी आपला सहभाग नोंदविला...सांस्कृतिक कार्यक्रम व महिला भगिनींना भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता झाली... महिला आघाडी पदाधिकारी यांनी महिला मेळाव्याकरीता विशेष प्रयत्न केले...