प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा : चणेरा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत शुभम किशोर देसाई यांची प्रथमच महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली...
शुभम देसाई हे ग्रामपंचायत मध्ये एक महत्वाचे व्यक्ती असून, त्यांनी या पदावर येण्यापूर्वी चणेरा पंचक्रोशी मध्ये खूप सारे सामाजिक कार्य केलेले आहेत... तसेच चणेरा गावामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले आहेत त्या मध्ये आरोग्य तपासणी शिबिर , आयुष्यमान भारत कार्ड शिबिर , वयोश्री योजना व अनेक विविध प्रकारच्या शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविल्या आहेत...
विशेष म्हणजे समिती वर येण्या अगोदर त्यांनी गावातील अनेक तंटे त्वरित व लोकाभिमुख पद्धतीने सोडवले आहेत... त्यांच्या कामाचा ग्रामस्थांवर प्रभाव पडल्यामुळे त्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे... गावकऱ्यांचा विश्वास आणि त्यांच्या पारदर्शी कामगिरीमुळे ते या पदावर येणारे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत...
ग्रामसभेला सरपंच राजेंद्र इंदुलकर, उपसरपंच प्रसन्ना सिनकर, सदस्य राज कोरगावकर, किशोर मोरे, सदस्या शलाका विचारे, आरती मयेकर, पूजा विचारे व पोलिस पाटील गिरीश विचारे यांनी निमंत्रक म्हणून कार्य पार पाडले तसेच , महसूल विभाग कडून कोतवाल महेंद्र चिपळूणकर आणि ग्रामसेवक नारायण शिद उपस्थित होते... तसेच ग्रामसभेला ग्रामस्थ व तरुण वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती...
