कोलाड (श्याम लोखंडे) : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे विधान भवन मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते मा. आ.अनिकेत तटकरे यांना सन २०२३-२४ चा महाराष्ट्र विधानपरिषद ‘‘उत्कृष्ट संसदपटू’’ पुरस्कार प्रदान करत त्यांना सन्मानीत करण्यात आले...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे युवा नेतृत्व आ. अनिकेत तटकरे यांची विधीमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, संसदीय परंपरा, शिष्टाचार यांची जाण, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, उपस्थिती, विधिमंडळात प्रश्न मांडताना वापरलेले कौशल्य, वक्तृत्व शैली या माध्यमातून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली...
युवकांचे प्रेरणास्थान रायगडचा आवाज मा.आ.अनिकेत तटकरे यांची विधानपरिषद व कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आल्यानंतर लोकोपयोगी कार्यात नेहमीच सक्रीय सहभाग घेत असत... मा. आ. अनिकेत तटकरे यांनी समाजकारण व राजकारण यांची सांगड घालत समाजातील प्रत्येक घटकाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी काम करीत आहेत... तरुणांना एकत्र करीत त्यांच संघटन करून तरुणांना नेहमीच पाठबळ देण्याच काम केले... सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा कला,पर्यावरण,क्षेत्रात भरीव योगदान देत सर्व सामान्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याच काम मा. आ अनिकेत तटकरे यांनी केले... शांत, संयमी व संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून आमदार अनिकेतभाई तटकरे यांची ओळख असुन त्यांचा रायगडच्या राजकारणात वेगळाच प्रभाव आहे... अशा बहुआयामी युवा नेतृत्वाचा उत्कृष्ट संसदपटू’’ पुरस्काराने अनिकेत तटकरे यांना सन्मानीत करण्यात आल्याने रोहा तालुका रायगड सह कोकण वाशिय युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे... मा.आ.अनिकेत तटकरे यांना उत्कृष्ट संसदपटू’’ पुरस्कार मिळाल्याबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणीक व विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा तसेच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...
