महाराष्ट्र वेदभुमी

पिंपरी येथे पारंपरिक रीतीनुसार पिंपरीगावात बैलपोळानिमित्त तान्हा पोळा साजरा


वार्ताहर (कन्हान पिंपरी): पिंपरी येथे पारंपरिक पद्धतीने बैल पोळा हा साजरा करण्यात आला..सुभाष तिवाडे यांचा राहत्या घरून वाजत गाजत गुढी काढण्यात आली... सुभाष तिवाडे यांच्या हस्ते महासम्राट बळीराजा फोटोचे पूजन व पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करून बैलपोळा साजरा करण्यात  आला... प्रसंगी सुभाष तिवाडे, प्रशांत बाजीराव मसार, आकाश महतो,रमेश ठाकरे, अशोक मेश्राम, दयाराम वाघाडे,रमेश खंगारे, देवा चतुर, कुणाल खडसे, सोनु कुरडकर आदी नागरिक उपस्थित होते...


तसेच आकाश महातो मित्र परिवारा तर्फे तान्हा पोळा साजरा करण्यात आला... याप्रसंगी लहान मुले,मुली यांनी विविध पोशाख परिधान करून लाकडी नंदीची  सजावट करून आणले त्यांचा उत्साह वाढविण्याकरिता सोबत जेष्ठ नागरिकांनी सुद्धा यात सहभाग घेतला.. तसेच यांना शालेय पारितोषिक बक्षीस वितरण करण्यात आले..  प्रसंगी आयोजक आकाश महातो, प्रशांत बाजीराव मसार, रवींद्र मेश्राम, संजू सायरे, कुणाल खडसे, ऋषी हावरे उपस्थित होते...




Post a Comment

Previous Post Next Post