महाराष्ट्र वेदभुमी

माणगाव उबाठा शिवसेना पक्षातर्फे जोशी वडेवाला प्रकरणात कार्यवाहीची मागणी.

माणगाव :- (प्रतिनिधि) : माणगाव तालुक्यातील एक भयानक कृत्य माणगावमधील जोशी वडेवाल्याने केलेली ग्राहक कुटुंबास मारहाण या प्रकारणाच्या संदर्भात शनिवारी दि.१४ रोजी शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे या पक्षाचे दक्षिण रायगड संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, युवासेना रायगड चिटणीस डॉ. अमेय उभारे, माणगाव नगर पंचायतीचे नगरसेवक अजित तारलेकर, रायगड सह-संघटक सुधीर सोनावणे, युवासेना शहर प्रमुख अजिंकेश जाधव, शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीण पाटोळे, इब्राहिम करेल, शाखाप्रमुख हार्दिक काते, शाखाप्रमुख ऋषिकेश मोरे व अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रकरणा संदर्भात माणगाव पोलीस स्टेशनला जाऊन संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधीत अधिकारी वर्गाला दोषींवर योग्य ती केठोर कारवाई व्हावी व संबधीत मालकालांदेखील आपण समज देऊन पुन्हा असे प्रकार घडणार नाही अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने करण्यात आली...   

  दरम्यान सदर हॉटेल मुंबई गोवा महामार्गावर माणगाव रेल्वे स्टेशन जवळ आहे... या हॉटेल पुणे येथील नामांकित जोशी वडेवालेच्या फ्रांचायसी घेवून चालवत असे... तर घडलेल्या घटनांचा तीव्र दखल घेऊन तसेच निषेध नोंदवून पुणे येथील जोशी वडेवालेच्या मालकांनी माणगाव येतील जैस्वाल संचालित जोशी वडेवालाच्या फ्रांचाईज तात्काळ रद्द करुन या पुढे आपला नावाचे वापर करू नये तसेच नोटीसमध्ये २४ तासात घडलेला प्रकार खुलासा करण्यात यावा अशी पत्रात कळविण्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post