नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग देवालापर येथील घटना
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरील देवलापार येथील ट्रक व दुचाकीचा झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यु झाला... नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर देवलापार येथील समोर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्पा प्रयत्नात कंटेनरने दुचाकीला मागुन जोरात धडक दिली... यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला... ही घटना देवलापारयेथे सांयकाळी ५ : ०० सुमारास घडली... मृतकाचे नाव गोपीचंद वाहाने वय ६१ रा देवलापार असे आहे... ते दोन वर्षापूर्वी वनविभागातून सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते...
याबाबत माहिती अशी की, गोपीचंद वाहाने हे नेहमीप्रमाणे फिरायला गेले होत... ते त्यांचे मोटर सायकल क्र.एमएच ४० बीआर ८९२३ ने ग्रामीण रुग्णालय ते बस स्टॅडकडे येत होते... पाठीमागून नागपूर कडून जबलपूर कडे कंटेनर क्र. एचआर ५५ यु १४११ जात असतांना त्याचे सोबत एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोरात धडक बसली... त्यामुळे संतूलन बिघडल्याने त्याने गोपीचंद यांना चिरडले...त्यांच्या पायावरुन कंटेनरचे चाक गेल्याने दोन्ही पायांचा चुराडा झाला तर मोटर सायकल फरफटत गेली...त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी कठडेही तोडले...इतका भीषण गभिर स्वरूपाचा अपघात झाला असून त्यांना देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयातील त्वरीत दाखल करण्यात आले... प्राथमीक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात येत होते... परंतू त्याआधीच त्यांनी रस्त्यातच अखेरचा श्वास घेत त्याचा मृत्यु झाला...
या प्रकरणी देवलापार पोलीसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदकरुन पुढील तपास करीत आहे...
