उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे ): उरण मधील अनेक विद्यार्थी विद्यार्थीनीनी अनेक क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी केली आहे... तशीच उत्तम व नेत्र दिपक कामगिरी उरणच्या वरदा आसरकर ने केल्यामुळे तिला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे...वरदा केदार आसरकर हिला स्केटिंग या खेळामध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावल्यामुळे हॉकी लिजेंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले... त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे...
वरदा आसरकर हिला आतापर्यंत केलेल्या स्केटिंग या खेळामध्ये उत्कृष्ठ कामगिरीची दखल घेऊन हॉकी लिजेंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ (कराड, सातारा) येथे सन्मानित करण्यात आले... या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अमोल साठे व ऍड.सुरेंद्र कॅमेरामन (आशियाई सुवर्ण पदक विजेता) यांच्या टीमतर्फे करण्यात आले होते... दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस हॉकीचे जादूगार मे. ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो...
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या क्रिडापटूंना सन्मानित करण्यात येते...वरदा आसरकर हिला पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आल्या बद्दल व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...तर अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी तिची भेट घेउन तिला शुभेच्छा दिल्या आहेत...