सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : तालुक्यातील मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे अनेक प्रकार समोर येत आहेत... तशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत...या पार्श्वभूमीवर रामटेक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे... पोलिसांनी धाडसी कारवाई करत ३ दुचाकी चोरांना अटक केली आहे...
रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामटेक शहरात १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता सौरभ शंकर दिवटे रा अडेगाव तहसील मौदा हे आपल्या कुटुंबासह रामटेक येथे आनंद मेला पाहण्यासाठी आले होते... त्यानंतर त्यांची मोटारसायकल स्प्लेंडर क्र. एमएच ४० एपी ४९७५ चोरीला गेली... रामटेक पोलिसांनी २६ ऑगस्ट रोजी खबऱ्यांद्वारे कारवाई करून आरोपी रोशन शंकर वाघाडे वय १९ वर्षे, रा. खंडाळा, निखिल बाळकृष्ण चन्ने वय २१, प्रज्वल पचरू वैद्य वय १८ वर्षे, दोघे रा. कचूरवाही यांना अटक केली..
आरोपींकडून चोरीला गेलेली, २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल व आरोपीची बजाज मोटारसायकल क्रमांक एमएच ४० टी १०२१ किमतीचा ३० हजार रुपये, एकूण ५० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला...
ही कारवाई नागपूरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक नागपूर रमेश धुमाळ, रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, पो.उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, पो.उपनिरीक्षक हरिचंद्र मोरे, पो. हवालदार अमोल इंगोले, पो.हवालदार गजानन माहुरे, पो.ना प्रफुल रंधई, पो.शिपाई मंगेश सोनटक्के, पो.शिपाई शरद गिते, पो.शिपाई धिरज खंते, पो.शिपाई योगेश कुयटे, चापोशी विशाल चव्हाण ने केली...
आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
दरम्यान, या तिघांच्या अटकेनंतर रामटेक तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे... पोलीस या आरोपींची चौकशी करत आहेत... या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे... मात्र, सध्या दुचाकी चोरी झालेल्या नागरिकांनी रामटेक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रामटेक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी केले आहे... याप्रकरणी अधिक तपास पो.उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार सह रामटेक पोलीस हे करीत आहेत...
