कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यातील चणेरा विभाग खैराळे गावचे सुपुत्र तालुका कुणबी समाजाचे उपाध्यक्ष विविध सहकारी सोसायटी चेअरमन शेतकरी कामगार पक्षाचे तसेच भाई जयंता पाटील यांचे खंदे समर्थक गोपीनाथजी मारुती गंभे यांनी गेली अनेक वर्षे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चणेरा येथील शाखेचे चेअरमन पद भूषवून चणेरा विभाग (पारंगखार ते गोफण) येथील श्रमजीवी गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज सेवा देऊन त्यांच्या कडून चांगल्या प्रकारे वसुली देखिल करत एक सहकार क्षेत्रातील चांगला आदर्श निर्माण केला असून त्यांचा विशेष सन्मान बँक शाखेच्या वतीने करण्यात आला...
तर गंभे यांनी सन २०२४ ते २०२५ या आर्थिक वर्षात २ कोटी ५० लाख रुपये पेक्षा जास्त रक्कमेचा लाभ येथील शेतकऱ्यांनी घेतला. व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेती व्यवसायाकरिता तसेच त्यांच्या उद्योग व्यवसाय करण्यासाठी सर्वोत्तम जमेची बाजू ठरली असून गोपिनाथ गंभे यांनी येथील शेतकरी वर्गाला दिलेली सेवा व खुप मोठे मोलाचे सहकार्य या कार्याची दखल घेत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अलिबाग यांच्यावतीने त्यांचा २४ ऑगस्ट रोजी त्यांना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आहे...
रोहा तालुक्यातील चणेरा सारख्या दुर्गम आणि ग्रामीण भागात येथील कुणबी समाज तसेच सर्व समाज घटकांना श्रमजीवी, कष्टकरी, शेतकरी, गोर गरीब यांना शेती व्यवसाय करण्यासाठी या शाखेच्या माध्यमातून अर्थिक दृष्ट्या सक्षम तसेच बळ देण्याचे काम केले.तसेच एवढं महानकार्य करून कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी व गवगवा नाही,अशा या सामाजिक कार्य करणाऱ्या समाजनेत्याला या विभागातील गोर गरीब मानाचा मुजरा करत त्यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...