शिवगर्जना युवा प्रतिष्ठान यांची निवेदन देऊन मागणी.
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- शहरात मोकाट जनावरांच्या त्रासाने नागरिक, व्यावसायिक सारेच प्रचंड वैतागलेले आहेत. मनसर, पवनी, देवालापार, नागपूर -जबलपूर रस्त्यावर मोकाट जनावरांची बसलेल्या झुंडीमुळे वाहतुकीस अडथळा तर होतोच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे...
मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे येथील नागरिकांसह येणारे भाविक वाहनधारक तसेच व्यावसायिक पुरते हैराण झाले आहेत...आधीच भटकी कुत्र्याचा उपद्रव आहे, त्यात आता मोकाट जनावरांची डोकेदुखी वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे...
रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून होणारे अपघात थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे व बेजबाबदार पशुपालकांकडून दंड आकारावा असे निवेदन शिवगर्जना युवा प्रतिष्ठान,मनसर तर्फे प्रशासनाला करण्यात आले आहे...
दोन दिवसा अगोदर मनसर-रामटेक मार्गावर वाहिटोला येथे भरदाव ट्रकच्या धडकेत एकूण १२ निष्पाप वासरांचा जीव गेला होता... यात ट्रकचालकासहित पशु-पालकाचीही निष्काळजीपणा असावी असं म्हणता येईल...याच परिसरात नव्हे तर नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील पवनी, देवलापार, चोरबाहुली, कान्द्री माईन, मनसर, शितलवाडी, रामटेक अशा मुख्य मार्गावर देखील जनावरे उभे अथवा बसून असल्याचे चित्र दिसून येतात... अशातच रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो तो वेगळा भाग... मात्र या जनावरांमुळे अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात देखील झाल्याचे लक्षात येते... यात जनावरांच्या आणि सामान्य माणसांच्या देखील जीवाला धोका निर्माण होतो. अशा वेळी या जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे...
रस्त्यावर असणाऱ्या जनावरांची सोय करावी व खासगी मालकीचे जनावरे असल्यास मालकावर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी शिवगर्जना युवा प्रतिष्ठान मनसर यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे...
व्यावसायिक झाले त्रस्त
"मोकाट जनावरांमुळे आम्ही व्यावसायिक त्रस्त झालो आहोत. रोज सकाळी दुकान उघडताना पहिले या मोकाट जनावरांनी टाकलेले शेण, गोमूत्र साफसफाई करावी लागते. त्यामुळे संपूर्ण दुकानात माशी मच्छर व शेणगोमूत्राच्या वासाने आम्ही दुकानदार त्रस्त झालो आहोत..."
गुन्हा मालकांवर दाखल करा
मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव बघता ग्रामपंचायतीने केंद्र व राज्यशासनाच्या केंद्र, राज्याचे कायदे पशू क्रूरता नियम व अधिनियम १९६०, मुंबई पोलिस कायदा १९५१ अंतर्गत जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करावे तसेच बेवारस जनावरांची गोशाळेत रवानगी करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे...