महाराष्ट्र वेदभुमी

सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी


तहसील कार्यालय रामटेक वर काढली संयुक्त विरोधी रॅली


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमीलेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच, २१ ऑगस्ट रोजी १४ तासांसाठी भारत बंदची हाक दिली होती.

सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती व जमाती आरक्षणात क्रिमीलेअर लागू करण्याच्या निर्णयाविरुद्ध दलित आदिवासी संघटनाद्वारे पुकारलेल्या बंदला समर्थन देत बुधवार दि. २१ ऑगस्टला दुपारी एक वाजता डॉक्टर आंबेडकर चौक रामटेक येथुन तहसील कार्यालय रामटेकपर्यंत विरोध रॅली काढण्यात आली...तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तहसीलदार रमेश कोळपे यांना यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले... हा निर्णय बाबासाहेबांच्या संविधानाला अनुषंगाने विरोध करणारा आहे... हा निर्णय ओबीसी, एससी, एसटी जाती जातीत फूट पाडणारा आहे... असा आरोप त्यांनी यावेळी केला.. 

या रॅलीत गोंडवाना गणतंत्र पार्टी, सीपीआय एम, प्रहार जनशक्ती पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, ओबीसी संघटना, सोशल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाईचे पदाधिकारी हरीश उईके, रमेश कारमोरे अँड.आनंद गजभिये, राजू हटवार, सौ कांचनमाला माकडे, राहुल जोहरे, अमित अंबादे, प्रयास ठवरे, मनीष खोब्रागडे, राजेश सांगोळे भारती गजभिये,रियान खान ,नाना उराडे महेश बनन्होटे, प्रवीण बेले सहित समर्थक उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post