माणगाव :- (नरेश पाटील): तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता ते दुपारी 3.00 वा . मध्यवर्ती प्रशासकीय भवन , तहसिल कार्यालय सभागृह माणगाव येथे आयोजित करण्यात आली आहे...
सदरील महोत्सवामध्ये विविध रानभाजी नमूने, पाककृती स्पर्धा, रानभाजी विक्री इत्यादी चे आयोजन केले आहे... तसेच रानभाज्यानचे आहारातील औषधी महत्त्व इ.बद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे...
माणगाव तालुक्यातील महिला शेतकरी गट/बचत गट यांनी सहभागी होण्यासाठी गावांतील कृषि सहाय्यक,तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालय माणगाव येथे संपर्क करावे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी श्री.अजय वगरे यांनी केले आहे...
