महाराष्ट्र वेदभुमी

सोमजाई माता क्रीडा मंडळ ट्रस्ट खरसई शैक्षणिक स्तुत्य उपक्रम.

शरद पाटील : मुरुड :सोमजाई माता क्रीडा मंडळ ट्रस्ट खरसई नेहमी सामाजिक, शैक्षणिक व इतर अनेक क्षेत्रात निरनिराळे उपक्रम राबवत असते.  यावर्षीही म्हसळा तालुक्यातील मु. खरसई येथील उपरोक्त मंडळाने शैक्षणिक उपक्रम नुकताच 29 जुलै ते 1 ऑगष्ट या या चार दिवसांत पार पाडला... हा कार्यक्रम म्हसळा, श्रीवर्धन, तळा, मुरुड तालुक्यातील खरसई, रेवली, बनोटी, आगरदांडा, खरगाव (बु.), देवघर कोंड, मेंदडी, काळसुई, तुरुंबाडी, नानवेली, गोंडघर, चोरढे, कळमशेत ई. गावांतील प्राथमिक व माध्यमिक शाळांवर राबविण्यात आला आणि यामध्ये मुलांना मार्गदर्शन करून शैक्षणिक साहित्य देण्यात आले...

गेली 50-55 वर्षे मा. श्री. चंद्रकांत खोत (भाऊ) यांच्या नेतृत्वाखाली महिला सबळीकारण, योग प्रशिक्षण, शासकीय योजना, सहकार क्षेत्र, सामाजिक जनजागृती, क्रीडाक्षेत्र, अध्यात्मिक धार्मिक क्षेत्र अशाप्रमाणे सर्व क्षेत्रातील प्रशिक्षण सातत्याने करीत आहेत...

सदर कार्यक्रम राबविताना श्री. राम मांदारे, भालचंद्र पयेर, दत्ताराम पयेर, भालचंद्र शितकर, महादेव कांबळे, नरेश कातळकर,  नारायण पयेर, नारायण खोत, यशवंत मेंदडकर, रमेश मेंदडकर या कार्यकर्त्यांनी अतोनात परिश्रम घेतले...

सोमजाई माता क्रीडा मंडळ ट्रस्ट खरसई यांनी असेच समाजप्रबोधनाचे कार्य करत राहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.

Post a Comment

Previous Post Next Post