दादर-पेण/२१ ऑगस्ट अजय शिवकर: सध्या सर्वत्र मुलींची छेडछाड, त्यांचा विनयभंग, जबरदस्ती, बलात्कार ,त्यांचा खून अशा अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहेत.. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा पाय लाडग्यांच्या जबड्यात असल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे...त्यामुळे कित्येक महिला वर्गांना बाहेर निघण्याची ही भीती वाटू लागली आहे.., एकंदरीत महिलांचा सुरक्षेतेचा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे... प्रशासनाने याबाबतीत कठोर कायद्याचे अवलंब करावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे... अन्यथा सामान्य माणसाला कायदा हातात घेतल्या वाचून पर्याय उरणार नाही...
पेण तालुक्यातील दादर गावातील शाळेत शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या दोन परप्रांतीयांना गावातील महिलांनी बेदम चोप देऊन डांबून ठेवले... दादर सागरी पोलीस वेळेत घटनास्थळी हजर झाल्याने मात्र पुढील अनर्थ टळला... दोन्ही परप्रांतीय आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे... राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींची छेडछाड प्रकरणे सुरू असतानाच दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या दरम्यान दादर गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात फिर्यादीची मुलगी व तिच्यासोबत शाळेत शिकणाऱ्या अन्य दोन अल्पवयीन मुलींची परप्रांतीय आरोपी अखिलेश शामजी सैनी वय २०वर्षे व मुंनुकुमार त्रिभुवन चौहान वय २२ वर्षे दोघेही. मिक्सर रिपेरिंग करण्याच्या बहाण्याने आलेले, सध्या जिते गावात राहत असलेले मुळ राहणार धंधरा, पो. लक्ष्मीनगर, ता. तुळशीपुर, जि. बलरामपूर- उत्तरप्रदेश यांनी त्यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने मोबाईल व चॉकलेट दाखवून हाताने बोलवण्याचा इशारा करून अश्लील हावभाव करत छेडछाड केली... सदर प्रकार अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांना, गावकऱ्यांना व गावातील महिलांना समजताच त्यांनी दोन्ही परप्रांतीय आरोपींना पकडून बेदम चोप देत डांबून ठेवले... ही घटना दादर सागरी पोलिसांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस घटनास्थळी पोहचले... त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला...
सदर घटनेची नोंद दादर सागरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 67/2024, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 79, 3 (5), लैंगिक अत्याचार व अपराधापासून बालकांचे संरक्षण अधि. 2012 चे कलम 12 नुसार गुन्ह्याची नोंद केली असून उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशे हे अधिक तपास करीत आहेत...
