महिला पत्रकाराचा अपमान व लज्जित करणारे !..
म्हात्रेवर पोलीसांनी कठोर कारवाई करावी नाहीतर आम्हा महिला पत्रकारांच्या ताब्यात द्यावं..
मा मुख्यमंत्री दादा आमची मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी..
"तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे," वामन म्हात्रे या व्यक्तिचा हिडिस वक्तव्याचा ; मिडिया असोसिएशन ऑफ इंडियाने तीव्र शब्दात निषेध केला आहे..!
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन चार वर्षांच्या दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला... आज सकाळपासून बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक व नागरिकांनी आंदोलन सुरू केले... यापैका काहीनी सकाळी साडे दहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकाकडे मोर्चा वळवला...त्यामुळे मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद झाली...
या घटनेचा सर्व पातळीवर निषेध व्यक्त होतोय... सकाळच्या महिला पत्रकाराने बालिका अत्याचाराचा विषय आपल्या माध्यमातून चार दिवसापासून लावून धरला होता...त्याने बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचे सर्वच नियंत्रण सुटले, महिला पत्रकाराला अडवून,'तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, '...काय ही भाषा,काय हा नेता? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेऊन वामन म्हात्रे याच्यावर कारवाई करावी...अन्यथा आम्हा फक्त १० महिला पत्रकारांच्या ताब्यात द्यावे, म्हणजे कशी भाषा वापरू नये याचा धडा त्याला देता येईल..! अशी मागणी माईच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे...
